घरताज्या घडामोडीIndian Railways: भारतीय रेल्वेकडून अनेक पॅसेंजर ट्रेन रद्द, कोळसा वाहतुकीला रेल्वे मंत्रालयाचे...

Indian Railways: भारतीय रेल्वेकडून अनेक पॅसेंजर ट्रेन रद्द, कोळसा वाहतुकीला रेल्वे मंत्रालयाचे प्राधान्य

Subscribe

भारतात काही पॅसेंजर ट्रेनची वाहतूक ही कोळसा वाहतूक वेगवान करण्यासाठी रोखली आहे. देशात अनेक वीज निर्मिती संचाच्या ठिकाणी असणारा कोळशाचा तुटवडा पाहता भारतीय रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कोळसा संचाच्या ठिकाणी जलदगतीने कोळसा उपलब्ध व्हावा या उद्देशानेच ही पॅसेंजर गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. देशात मोठ्या प्रमाणात पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याबाबत भारतीय रेल्वेने महत्वाची माहिती दिली आहे.

देशात वाढलेल्या उकाड्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी देशात कोळशाची विजेची मागणीही वाढली आहे. देशातील विजेच्या मागणीच्या ७० टक्के विजेची मागणी ही औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून भागवण्यात येते. त्यामध्ये कोळशावर आधारीत वीज प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. देशात अनेक भागातील विजेचा पुरवठा खंडित होण्यासाठीचे कारण वीज संचातील कोळसा तुटवडा आहे. अनेक भागात कोळसा तुटवड्याचा परिणाम हा वीजनिर्मितीवर झालेला आहे. कोळसा तुटवड्यामुळे अनेक संचाच्या ठिकाणची वीज निर्मिती ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी भारनियमाची परिस्थिती ओढावण्यासाठी कोळसा तुटवडा हे मुख्य कारण आहे. अनेक उद्योगांनाही उत्पादनामध्ये कपात करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळेच देशात महागाईत भर पडण्यासाठी हादेखील एक मुद्दा समोर आला आहे. देशात अनेक ठिकाणी विजेच्या तुटवड्याचा मुद्दा गाजत असतानाच रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आणखी संकटांमध्ये भर पडणार आहे.

- Advertisement -

पॅसेंजर ट्रेनच्या निमित्ताने घेण्यात आलेला निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असा आहे. कोळसा आणि वीजनिर्मितीची परिस्थिती सामान्य होताच पॅसेंजर सेवा पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव बन्सल यांनी दिली. अनेक राज्यांना वीज संचांच्या ठिकाणी कोळसा नेण्यासाठीच मालवाहू गाड्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेकदा कोळसा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीचे डबे उपलब्ध नसणे हे मुख्य कारण समोर आले आहे. अनेक मार्गांवर असणारे व्यस्त असणारे मार्ग, पॅसेंजर तसेच मालवाहतुकीच्या गाड्या, उशिरा दाखल होणाऱ्या गाड्या यासारखी महत्वाची कारणे ही रेल्वे वाहतुकीच्या समोर असणारी मुख्य कारणे आहेत. त्यामुळेच अनेकदा मालवाहतुकीच्या मार्गावर मालवाहू गोष्टी उशिरा पोहचण्यावर परिणाम होतो. पण अशातही कोळसा वाहतूक करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

- Advertisement -

रेल्वेने येत्या काळात १० हजार आणखी वॅगॉन्सच्या माध्यमातून कोळसा वाहतुकीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मालवाहतूक वेगाने करण्यासाठी हा निर्णय रेल्वेने घेतला आहे. देशातील अनेक कोळसा खाणीच्या ठिकाणी १७ टक्के इतकी कोळशाी उपलब्धतता कमी झाली आहे. अनेक राज्यात कोळसा तुटवड्याने ब्लॅकआऊट निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी भारनियमन झाल्याचेही समोर आले आहे.

भारतीय रेल्वेकडून देशात एकुण ६५७ पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये ५०० मेल आणि एक्सप्रेसचा तसेच १४८ प्रवासी वाहतुकीच्या फेऱ्या रद्द केल्याची माहिती आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही वाहतूक नियंत्रित ठेवण्याचा रेल्वेचा निर्णय़ आहे. त्यामध्ये कोळसा वाहतुकीला रेल्वेने प्राधान्य दिले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -