घरदेश-विदेशIndian Railways: विद्यार्थ्याने शोधला IRCTC च्या वेबसाईटचा 'बग', डेटाबेसचा मोठा धोका टळला

Indian Railways: विद्यार्थ्याने शोधला IRCTC च्या वेबसाईटचा ‘बग’, डेटाबेसचा मोठा धोका टळला

Subscribe

चेन्नईतील १२ वीत शिकणाऱ्या सतर्क विद्यार्थ्यामुळे भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम युनिट IRCTC च्या वेबसाईटवरील ‘बग’ शोधून काढता आला आहे. ज्यामुळे वेबसाईटवरील डेटाबेस लीक होण्यापासून धोका टळला आहे. य़ा विद्यार्थ्यांने IRCTC ला वेबसाइटवरील बग संदर्भात माहिती कळवली त्यानंतर ही समस्या दूर करण्यात आली आहे. या वेबसाइटवर इनसिक्योर डायरेक्ट आब्जेक्ट रिफरेंसेज (आयडीओआर) दिसत होते. या माध्यमातून IRCTC वेबसाइटवरील प्रवाशांची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकली असती.

यावर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्याच्या तक्रारीची दखल घेत IRCTC ने ही तांत्रिक समस्या दूर केली आहे. यामुळे आता आमची ई-तिकीट प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे. वेबसाइटवरील बगची समस्येची माहिती आम्हाला ३० ऑगस्ट २०२१ ला समजली त्यानंतर आम्ही २ सप्टेंबरला ती दूर केली.

- Advertisement -

विद्यार्थ्याने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमलाही दिली माहिती

चेन्नईतील तंबारममधील एका खासगी महाविद्यालयात १२ वी इयत्तेत शिकणारा पी. रेंगानाथम  ३० ऑगस्टला IRCTC च्या वेबसाईटवर तिकिट बुक करत होता तेव्हा त्याला वेबसाइटवर बग (आयडीओआर) दिसले. ही अतिशय सामान्य समस्या होती. मात्र त्याने डेटा लीक होण्याचा धोका ओळखत याबाबतची माहिती इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्सला कळवली.

यानंतर विद्यार्थ्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या सीईआरटीला एक पत्र ईमेल केले. या पत्रात त्याने लिहिले की, IRCTC च्या वेबसाइटवरील बगच्या माध्यमातून कोणीही दुसऱ्या व्यक्तीचे तिकिट रद्द करु शकतो. तसेच त्याची वैयक्तिक संवेदनशील माहिती गोळा करु शकतो.

- Advertisement -

भारतीय रेल्वे उचलणार महत्त्वाची पाऊले

भारतीय रेल्वे ऑक्टोबरमध्ये काही महत्त्वाची पावले उचलणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय रेल्वेचे एक नवे वेळापत्रक जारी होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ते जाहीर होऊ शकले नाही, मात्र आता हळूहळू रेल्वे आपल्या वेळापत्रकात आणि अनेक सेवा सुविधेमध्ये बदल करत आहे. सध्या, सर्व विशेष गाड्या सोडल्या जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -