रेल्वेकडून एकूण १९६ गाड्या रद्द, ‘इतक्या’ गाड्यांच्या मार्गात बदल

तुम्ही रेल्वेने प्रवास (Railway Passengers) करणार असला तर, तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून (Railway) ७ जून मंगळवारी १९६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

modern railways equipped with new technology will get new speed one and a half lakh people will be recruited in a year

तुम्ही रेल्वेने प्रवास (Railway Passengers) करणार असला तर, तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून (Railway) ७ जून मंगळवारी १९६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, ७ गाड्यांच्या वेळापत्रकात (Railway Timetable) बदल केले असून, रेल्वेने एकूण ३ गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. (Indian railways irctc cancelled 196 trains on 7 June)

रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकात केलेल्या बदलांनुसार यामध्ये ट्रेन क्रमांक 04133, 05258, 12859, 13054, 19015, 22638 आणि 22906 यांचा समावेश आहे. शिवाय, रेल्वेने एकूण ३ गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 12650, 12650 आणि 18628 यांचा समावेश आहे.

गाड्या रद्द करणे, वळवणे किंवा रीशेड्युल करणे अशी अनेक कारणे आहेत. रेल्वे रुळांची देखभाल, रेल्वे रुळांवरून दररोज हजारो गाड्या जात असतात. अशा परिस्थितीत, या योग्य देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. तसेच, खराब हवामानामुळे किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वेला अनेकदा गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो.

रद्द, वेळापत्रक आणि वळवलेल्या गाड्यांची माहिती अशी तपासा

  • रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटला भेट द्या.
  • Exceptional Trains पर्याय दिसेल.
  • हा पर्याय निवडा.
  • रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करा.
  • हे तपासूनच घराबाहेर पडा नाहीतर तुम्हाला नंतर त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

मागील अनेक दिवसांपासून रेल्वेकडून गाड्या रद्द केल्या जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन रुळांच्या देखभालीचे काम सतत करत असते. रेल्वे गाड्यांच्या डब्यातही अनेकदा सुविधांमध्ये कमतरता असते. त्या भरून काढणे, तांत्रिक बिघाड यांसारख्या अनेक सुविधांमध्ये सुधारणा केली जाते.

आधार कार्ड IRCTC शी लिंक

IRCTC ने एक नवीन नियम बनवला आहे, ज्या अंतर्गत जर तुम्ही तुमचे आधार कार्ड IRCTC शी लिंक केले असाल तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. तुम्ही एका महिन्यात १२ तिकिटं बुक करू शकत होता. मात्र, काही नियमांत बदल झाल्यामुळे आता तुम्ही एका आयडीने एका महिन्यात २४ तिकिटं बुक करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड IRCTC शी लिंक केले नसेल तरीही तुम्ही एका महिन्यात १२ तिकिटं बुक करू शकता.


हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! IRCTCकडून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या