नवी दिल्ली : रेल्वे ही भारतातील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कुठूनही कुठेही जाण्यासाठी रेल्वेसारखा वेगवान आणि सोयीचा प्रवास नाही. त्यामुळेच शहरातल्या शहरात किंवा राज्याबाहेरील प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना पुरेशा सोयी – सुविधा मिळत नाहीत, अशा तक्रारी अनेकदा केल्या जातात. त्याबाबत आता भारतीय रेल्वेने काही निर्णय घेतले आहेत. (indian railways new rules blankets will be washed in 15 days)
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी कोचमध्ये वापरण्यात येणाऱ्या चादरी तसेच उशांचे अभ्रे नेहमीच स्वच्छ मिळतात असे नाही. त्याबाबत अनेकदा प्रवासी तक्रार करत असतात. त्यामुळे आता रेल्वे याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणार आहे. त्याव्यतिरिक्त ब्लँकेटची स्वच्छतादेखील आता दर 15 दिवसांनी केली जाणार आहे. रेल्वेकडून या निर्णयावर सध्या काम सुरू आहे.
हेही वाचा – Daughter kills Mother : लेकीनेच केला आईचा खून…धक्कादायक कारण आले समोर
रेल्वे मंत्रालयाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गुवाहाटीच्या रेल्वे लाँड्रीत काम सुरू केले आहे. गुवाहाटीतील रेल्वे लॉन्ड्रीमध्ये ब्लँकेट आणि चादरी धुण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ब्लँकेटच्या स्वच्छतेची प्रक्रिया वेगवान आणि प्रभावी आहे. एक ब्लँकेट साफ करण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा वेळ लागतो. ब्लँकेट धुण्याची प्रक्रिया चार भागांमध्ये विभागली जाते. ब्लँकेट 80 ते 90 डिग्री तापमानावर धुतले जाते. त्यानंतर ड्रायरमध्ये ते सुकवण्यात येते. कधी – कधी या प्रक्रियेला अधिक वेळ देखील लागू शकतो. मात्र, एक ब्लँकेट साफ करण्यासाठी 50 ते 55 मिनिटांपर्यंतचा वेळ लागू शकतो.
तर रेल्वेतील चादरी दररोज धुतल्या जातात. यासाठी देखील साधारण तासाभराचा वेळ मोडतो. बेडशीट मशीनमध्ये टाकून धुतल्या जातात आणि पुन्हा त्या वॉश, ड्राय आणि स्टीम आयर्नच्या पद्धतीने साफ केल्या जातात. एक ब्लॅंकेट धुण्यासाठी जवळपास 23.59 रुपयांचा खर्च असतो. यात जीएसटीदेखील असते.
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ब्लँकेट अनेकदा अस्वच्छ आणि व्यवस्थित धुतल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. संसदेतदेखील यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
हेही वाचा – Raj Thackeray : हे स्मारक तरी लालफितीत अडकू नये…सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त काय म्हणाले राज ठाकरे