घरताज्या घडामोडीरेल्वेने तयार केले एसी ३ नवीन कोच, १५ टक्क्यांनी वाढला फायदा आणि...

रेल्वेने तयार केले एसी ३ नवीन कोच, १५ टक्क्यांनी वाढला फायदा आणि सुविधा

Subscribe

एलएचबी प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या एसी ३ कोचमध्ये ८३ जागा तयार करण्यात आल्या आहेत. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये सामान्य एलएचबीचे एसी ३ डब्बे बसवण्यात आले आहेत.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये येत्या काळात स्लीपर कोचच्या जागी एसी३ चे अधिकाधिक डब्बे लावले जाऊ शकतात. या कोचचे भाडे सामान्य एसी३ डब्ब्यांपेक्षा कमी असेल तर स्लीपर कोचपेक्षा थोडी जास्त असेल. गरिब रथ या रेल्वे कोचच्या संकल्पनेवरुन एलएचबीने अशाप्रकारचे कोच तयार केले आहे. गरिब रथच्या साईडच्या तीन डब्ब्यांवर खूप टिका केली जाते मात्र यात अशाप्रकारचे कोच तयार केलेले नाहीत. एलएचबी प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या एसी ३ कोचमध्ये ८३ जागा तयार करण्यात आल्या आहेत. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये सामान्य एलएचबीचे एसी ३ डब्बे बसवण्यात आले आहेत. यात १५.२७ टक्के जास्त सिट्स बसवण्यात आल्या आहेत. २००६ पर्यंत गरिब रथच्या एसी ३ कोचमध्ये ७४ सिट्स होत्या मात्र आता नवीन कोचमध्ये तब्बल ८३ सिट्सची सोय करण्यात आली आहे.

रेल्वेचे हे नवीन एसी ३ कोच कपूरथला फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅकवरील ट्रायलच्या विविध चाचण्यांसाठी लखनऊच्या रेल्वे संशोधन, डिझाइन आणि मानक संघटनेकडे पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी विविध पद्धतीने त्याची तपासणी केली जात आहे. सर्व तपासण्या झाल्यानंतर या कोचला हिरवा कंदील दाखवण्यात येईल. या एसी३ कोचमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. अपंग नागरिकांसाठी स्वतंत्र बाथरुम तयार करण्यात आले आहे. प्रत्येक कोचला एसी व्हेंट देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूला फोल्डिंग टेबल्स, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी जागा, फोन, पुस्तके,मॅग्झिनची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक सिटला रिंडींग लाईट आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी प्लग देण्यात आला आहे. वरच्या सिटवर चढण्यासाठी असलेल्या शिडीची रचनाही बदलण्यात आली आहे. जेणेकरुन प्रवाशांना चढताना त्रास होणार नाही.

- Advertisement -

आरसीएफच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार,कोचमधील जागा वाढविण्यासाठी दोन ते तीन सिट्सच्या पायांची उंची कमी करण्यात येते.पण या कोचमध्ये असे काही करण्यात आले नाही. कोचची उंची फक्त काही इंचांनी कमी करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेले बेडरोल ठेवण्यासाठी स्टोअर त्याचबरोबर जेवण गरम करण्यासाठी हॉट केस आणि बोर्ड कॅबिनेटही काढून टाकण्यात आले आहे. स्विच बोर्ड कॅबिनेटला अंडर स्लंग करण्यात आले आहे. या कोचची ट्रायल यशस्वी झाली तर लोकप्रिय रेल्वेंच्या वेटींग लिस्टही कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. एका कोचमध्ये ११ बर्थ आहेत. २० डब्ब्यांच्या ट्रेनचा विचार केला तर २२० बर्थ होतात. नव्या एसी ३ कोचला वेटिंग लिस्टमध्ये टाकल्यास अतिरिक्त रेल्वे भाडे कमी करण्यास मदत होईल आणि लोकांना कमी भाड्यात एसी रल्वेचा प्रवास करता येईल.


हेही वाचा – Farmer Protest: १८ फेब्रुवारीला देशव्यापी ‘रेल रोको’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -