घरदेश-विदेशindian railway : रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांत मोठा बदल; 'या' ९ ट्रेनमधून...

indian railway : रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांत मोठा बदल; ‘या’ ९ ट्रेनमधून करता येणार जनरल तिकिटावर प्रवास

Subscribe

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासावर अनेक निर्बंध लागू केले होते. मात्र रेल्वे या नियमांत आता सतत बदल करत आहे. यापूर्वी रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी पूर्ण पत्ता आणि पिन कोड अनिवार्य करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा हे नियम बदलले आहेत. हे नियम सर्व गाड्यांना लागू नसतील मात्र काही ठरावीक गाड्यांना लागू होणार आहेत. विशेषत: झारखंड, बिहारच्या रेल्वे प्रवाशांसाठी ही दिलासाजनक बाब आहे. या राज्यांतील काही गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी संपूर्ण पत्त्याची अट रेल्वेने काढून टाकली आहे.

२० डिसेंबरपासून लागू होणार नवे नियम

रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला जिल्हा, पोस्ट ऑफिस आणि पिन कोड गरजेचा असतो. याशिवाय तुम्ही तिकीट बुक करु शकत नाही. रेल्वेच्या आरक्षण काउंटरपासून ते ऑनलाईन तिकीट बुकिंगपर्यंत ही माहिती देणे बंधनकारक आहे. पण २० डिसेंबरपासून झारखंडहून बिहारला जाणाऱ्या काही गाड्यांमध्ये आता पोस्ट ऑफिस, जिल्हा किंवा पिन कोडची गरज लागणार नाही. कारण रेल्वेने आजपासून झारखंड-बिहारच्या नऊ ट्रेनमध्ये जनरल तिकिटांवर प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यातून एक दिलासाजनक बाब म्हणजे आता काउंटरवरुन पाच मिनिटे आधीच तिकीट उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

५ मिनिटांत मिळणार तिकीट

तिकीट बुकिंग सेवा पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांना प्रवासासाठी आगाऊ तिकीट काढावे लागत होते. अचानक कुठे जायचा प्लॅन झाल्यास तिकीट मिळत नव्हते. आता जनरल तिकीट सुरु होण्याच्या १० मिनिटे आधीही तिकीट काढून तुम्ही प्रवास करु शकणार आहात.

‘या’ गाड्यांचे जनरल तिकीट उपलब्ध

१) 8625 आणि 18626 हटिया पूर्णिया कोर्टात कोशी एक्सप्रेसमध्ये D-6 ते D-11

- Advertisement -

२) 18635 आणि 18636 रांची सासाराम एक्सप्रेसमध्ये D-6 ते D-10

३) 18639 आणि 18640 रांची आरा एक्सप्रेसनमध्ये D-2 ते D-5

४) 18631 आणि 18632 रांची चोपन इंटरसिटीमध्ये D-6 ते D-10 पर्यंत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -