Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? मग Whats app वरून असं ऑर्डर करा जेवण

तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? मग Whats app वरून असं ऑर्डर करा जेवण

Subscribe

रेल्वेला प्रवाशांची लाईफलाईन म्हटले जाते. दररोज कोट्यावधी लोकं रेल्वेने प्रवास करतात. मात्र या रेल्वेने प्रवासादरम्यान आवडीचं जेवणं मिळणं हे फक्त एक स्वप्नासारखं होतं. पण आता प्रवाशांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण अशा प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने  एक आनंदाची बातमी दिली आहे. आता प्रवासी आपल्या पीएनआर नंबर वापरून प्रवासादरम्यान Whats app द्वारे ऑनलाईन जेवण ऑर्डर करु शकणार आहेत. भारतीय रेल्वेने याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. या निवेदनानुसार, भारतीय रेल्वेने आपल्या ई- कॅटरिंग सेवा अधिक ग्राहकांपर्यंत केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. याद्वारे भारतीय रेल्वेने अलीकडे रेल्वे प्रवाशांना ई- कॅटरिंग सेवेद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरण्याचं ऑप्शन दिलं होतं. यासाठी +91-8750001323 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरु करण्यात आलं आहे.

यापूर्वी भारतीय रेल्वेने Whats app कम्युनिकेशनद्वारे ई- कॅटरिंग सेवा दोन टप्प्यात सुरु करण्याची योजना आखली होती. यात पहिल्या टप्प्यात ई-तिकीट बुक करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस Whats app नंबर लिंक www.ecatering.irctc.co.in वर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी मेसेज पाठवला जाईल. या  पर्यायासह ग्राहक आयआरसीटीसीच्या ई- कॅटरिंग वेबसाईटवरून स्थानकांवर उपलब्ध असलेल्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीचं जेवण ऑनलाईन बुक करु शकतात. यासाठी प्रवाशांना कोणताही app डाऊनलोड करण्याची गरज नाही.

- Advertisement -

या सेवेच्या पुढील टप्प्यात, हा Whats app नंबर ग्राहकांसाठी एक Interactive माध्यमाचं काम करेल, म्हणजे यात एआय पावर चॅटबॉट प्रवाशांचे ई- कॅटरिंग सेवासंबंधीत प्रश्न घेईल, आणि त्यानंतर आपलं ऑनलाईन जेवण बुक केलं जाईल. सुरुवातीला, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे निवडक गाड्यांमध्ये ई-कॅटरिंग सेवांसाठी WhatsApp कम्युनिकेशन लागू करण्यात आले आहे. यानंतर ही सेवा इतर गाड्यांमध्ये सुरु केली जाईल.


भूकंपानंतर तुर्की, सीरियात सर्वत्र हाहाकार; 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू


- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -