Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Indian Railways : रेल्वेने अनेक विशेष गाड्या पुन्हा केल्या सुरु, पाहा संपूर्ण...

Indian Railways : रेल्वेने अनेक विशेष गाड्या पुन्हा केल्या सुरु, पाहा संपूर्ण वेळापत्रक यादी

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय रेल्वे अनेक लांबपल्ल्यांचा गाड्यांचा प्रवास थांबला होता. मात्र राज्यातील कोरोना स्थिती सुरळीत होत असताना भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. यासंदर्भात रेल्वेने एक यादी जाहीर करत वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे सेवांची माहिती दिली आहे. इतकेच नाही तर अनेक गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. उत्तर रेल्वे, मध्य रेल्वेने कोरोना काळात रद्द केलेल्या गाड्या पुन्हा सुरु केल्या आहेत. मध्य रेल्वेने मुंबई ते पुणे, मनमाड, जालना दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पुरी रथयात्रा लक्षात घेऊन रेल्वेने पुरीसाठी अनेक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया या विशेष ट्रेनची संपूर्ण यादी आणि वेळापत्रक…

१) ट्रेन क्रमांक 02123/02124 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे दरम्यान २५ ते २६ जून दरम्यान धावेल.

- Advertisement -

२) ट्रेन क्रमांक 01007/01008 – त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे दरम्यान २६ जूनपासून धावणार आहे. तसेच, 01008 ही गाडी २६ जूनपासूनच पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावेल.

३) ट्रेन क्रमांक 02271- २५ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालनादरम्यान धावेल.

- Advertisement -

४) ट्रेन क्रमांक 02272- जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 26 जूनपासून धावेल.

५) ट्रेन क्रमांक 02109 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी विशेष ट्रेन २६ जूनपासून धावणार आहे.

६) ट्रेन नंबर 02110 – मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २५ जूनपासून धावणार आहे.

७) ट्रेन क्रमांक 09205 – पोरबंदर – हावडा द्वि-साप्ताहिक (बुधवार आणि गुरुवार) सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ३० जून २०२१ पासून पुढील नोटीसपर्यंत विस्तारित केली जाईल.

मध्य रेल्वेने सुरु केल्या मुंबई आणि यूपीदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे

१) ट्रेन क्रमांक 01355 – आठवड्यातून एकदा लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरदरम्यान धावणार आहे. ही गाडी २९ जून, ६ जुलै आणि १३ जुलैला प्रवाशांसाठी धावणार आहे.

२) ट्रेन क्रमांक 01356- गोरखपूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे परतीचा प्रवास करेल. ही रेल्वे १ जुलैपासून सेवा देईल. या व्यतिरिक्त ८ आणि १५ जुलै रोजी ही गाडी धावणार आहे.

३) ट्रेन क्रमांक 05401 – गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन २३ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच ही ट्रेन ३० जून आणि ७ जुलै रोजी धावणार आहे.

४) ट्रेन क्रमांक 05402 – लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरकडे धावेल. ही ट्रेन २५ जून, २ जुलै आणि ९ जुलै २०२१ रोजी धावेल.

पुरीसाठी रेल्वेने सुरु केल्या अनेक विशेष गाड्या

१) ट्रेन क्रमांक 02887 – विशाखापट्टणम-निजामुद्दीन विशेष ट्रेन १ जुलैपासून चालविली जाईल.

२) ट्रेन क्रमांक 02888 – निजामुद्दीन – विशाखापट्टणम विशेष ट्रेन ३ जुलैपासून पुढील आदेशांपर्यंत धावेल.

३) ट्रेन क्रमांक 02857- विशाखापट्टणम – एलटीटी स्पेशल ट्रेन ४ जुलैपासून पुढील आदेशांपर्यंत धावेल.

४) ट्रेन क्रमांक 02858- एलटीटी-विशाखापट्टणम विशेष ट्रेन ६ जुलैपासून पुढील आदेशांपर्यंत धावेल.

५) ट्रेन क्रमांक 02866- पुरी- एलटीटी स्पेशल विशेष ट्रेन ६ जुलैपासून पुढील आदेशांपर्यंत धावेल.

६) ट्रेन क्रमांक 02865 – एलटीटी- पुरी स्पेशल ट्रेन ८ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत धावेल.

७) ट्रेन क्रमांक 02880 – भुवनेश्वर- एलटीटी स्पेशल ट्रेन १ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत धावेल.

९) ट्रेन क्रमांक 02879- एलटीटी- भुवनेश्वर स्पेशल ट्रेन ३ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत धावेल.

१०) ट्रेन क्रमांक 02827 – पुरी- सुरत स्पेशल ट्रेन ४ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत धावेल.

११) ट्रेन क्रमांक 02828 – सूरत- पुरी स्पेशल ट्रेन ६ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत धावेल.


 

- Advertisement -