घरताज्या घडामोडीभारतातील पहिली 'सात्विक' जेवण देणारी ट्रेन; जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावते?

भारतातील पहिली ‘सात्विक’ जेवण देणारी ट्रेन; जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावते?

Subscribe

ट्रेनने प्रवास करणाऱ्या शाकाहारी प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवासी शाकाहारी जेवणाला पसंती देतात. मात्र, बऱ्याचदा मांसाहारी आणि शाकाहारी एकत्र बनत असल्याने शाकाहारी प्रवाशी संबंधीत ट्रेनमधील शाकाहारी जेवण खाणं टाळतात.

ट्रेनने प्रवास करणाऱ्या शाकाहारी प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवासी शाकाहारी जेवणाला पसंती देतात. मात्र, बऱ्याचदा मांसाहारी आणि शाकाहारी एकत्र बनत असल्याने शाकाहारी प्रवाशी संबंधीत ट्रेनमधील शाकाहारी जेवण खाणं टाळतात. मात्र, आता या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून, भारतीय रेल्वेने एका ट्रेनमध्ये केवळ शाकाहारी जेवणच देण्याचे निश्चित केले आहे. ही ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस. (indian railways vande bharat express train offering only vegetarian meal)

वंदे भारतच्या नावाने आतापर्यंत ३ गाड्या धावू लागल्या आहेत. देशातील सर्वात जलद धावणाऱ्या या गाड्या आहेत. यापैकी 2 ट्रेनमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ उपलब्ध आहेत. तर दिल्लीहून कटरा वैष्णोदेवीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळते. या ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मांस, अंडी अशी कोणतीही वस्तू मिळणार नसून, फक्त शाकाहारी जेवण मिळेल.

- Advertisement -

विशेष म्हणजे, ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये कोणताही मांसाहारी पदार्थ ठेवला जात नाही आणि रेल्वे कर्मचारीही ट्रेनमध्ये असा कोणताही पदार्थ खाऊ शकत नाहीत.

भारतीय रेल्वेची ही सात्विक जेवण देणारी ट्रेन दिल्ली ते कटरा वैष्णोदेवी या मार्गावर धावते. या ट्रेनमध्ये चढणारे सुमारे 80 टक्के प्रवासी वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. अशा परिस्थितीत मांसाहाराने त्यांचे मानसिक संतूलन बिघडते. परिणामी रेल्वेने ही संपूर्ण गाडी सात्विक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – जो कोणी भेदभावाला कारणीभूत ठरेल त्याला संपवा; वर्ण आणि जाती व्यवस्थेवर मोहन भागवतांचे मोठे विधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -