घरदेश-विदेशभारतीय सुकन्येने साकारलेले चित्र 'नासा'च्या मुखपृष्ठावर

भारतीय सुकन्येने साकारलेले चित्र ‘नासा’च्या मुखपृष्ठावर

Subscribe

कमर्शियल क्रू अंतर्गत 'नासा'ने कॅलेंडर लॉंच केले आहे. या कॅलेंडरमध्ये भारतीय चिमुकल्यांनी आपले मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या कॅलेंडरचे मुखपृष्ठ भारतीय चिमुकलीने साकारले आहे.

‘नासा’ने नुकतेच नवीन वर्षाचे कॅलेंडर लॉंच केले आहे. कमर्शियल क्रू अंतर्गत ‘नासा’ने हे कॅलेंडर लॉंच केले आहे. या कॅलेंडरमध्ये भारतीय चिमुकल्यांनी आपले मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या कॅलेंडरचे मुखपृष्ठ भारतीय चिमुकलीने साकारले आहे. त्याचबरोबर भारतातील आणखी तीन विद्यार्थ्यांचे चित्र या कॅलेंडरमध्ये घेतले गेले आहे. यातील दोन विद्यार्थी हे महाराष्ट्राचे आहे. अंतराळात वास्तव्यास असणाऱ्या अंतराळवीरांचे आयुष्य आणि त्यांचे काम मुलांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘नासा’ने या कॅलेंडरची निर्मिती केली असल्याचे ‘नासा’ने सांगितले आहे.

हेही वाचा – नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

- Advertisement -

भारतातील चार विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड

नासाच्या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर निवड करण्यात आलेले चित्र हे भारतीय विद्यार्थीने साकारले आहे. ही विद्यार्थींनी उत्तर प्रदेशची आहे. या विद्यार्थींचे नाव दीपशिखा असे असून ती नऊ वर्षांची आहे. त्याचबरोबर आणखी एक अभिमानास्पद बाब अशी की, महाराष्ट्राचे दोन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांनाही नासाच्या कॅलेंडरमध्ये मानाचे स्थान आहे. या मुलांचे नाव इंद्रयुद्ध आणि श्रीहन असे आहे. इंद्रयुद्ध हा १० वर्षांचा आहे तर श्रीहन हा ८ वर्षांचा आहे. या दोघांनी एकत्रितपणे चित्र साकारले होते. या चित्राला नासाच्या कॅलेंडरमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर तामिळनाडुच्या थेमुकिलिमनच्या चित्राची निवड देखील करण्यात आली आहे. थेमुकिलिमन हा १२ वर्षांचा आहे. त्याने रेखाटलेले चित्र हे अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे.


हेही वाचा – पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधने

- Advertisement -

हेही वाचा – ‘यांना’ मिळणार चंद्रावर उतरण्याची संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -