CoronaVirus – कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचा मास्टर प्लॅन तयार!

कोरोनाशी दोन हात करायला शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त तंत्रज्ञान बनवलं आहे.

pune science center scientist got molecules which is regarding to cancer
scientist

भारतासह जगभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरला आहे. देशातील प्रत्येकजण कोरोनाविरूद्धची लढाई लढत आहे. पण आता भारतीयांना घाबरण्याची गरज नाही. कारण कोरोनाशी दोन हात करायला शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त तंत्रज्ञान बनवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात पुरेश्या उपकरणांची उपलब्धता नसताना या वैज्ञानिकांनी व विद्यार्थ्यांनी स्वस्तातील पोर्टेबल व्हेंटिलेटर, रोबो, ड्रोन, तपासणी किट, मास्क, सॅनिटायझर, फेसशीट, हातमोजे पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणारी पीपीआय किटपर्यंत तयार करून ते भारत सरकारला दिले आहेत. त्याचप्रमाणे नवे अऍपद्वारे तंत्रज्ञान विकसीत करत भारत सरकारला मदत केली आहे.

आयआयटी दिल्लीच्या एका विद्यार्थ्याने कोविड-१९ पीडितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची माहिती देणारा अऍप दिला आहे. , ‘ब्लूटूथ’ चा वापर करून हे अॅप सर्व व्यक्तींना ट्रॅक करू शकते. तसेच अलर्ट करू शकते. जे गेल्या काही दिवसांत कोरोना व्हायरसच्या संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. किंवा ते त्यांच्या जवळून गेले आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळून या व्यक्ती कधी गेल्या होत्या. याची तारीख व कोणत्या क्षेत्रात ही घटना घडली याची माहिती या अॅपच्या माध्यमातून उघड होणार आहे.

आय़आयटी रोपडचे आयआयटी रोपडचे बीटेकचा विद्यार्थी साहिर वर्मा यांनी संपर्क ओ-मीटर नावाचे एक मोबाइल अॅप बनवल आहे. जे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या क्षेत्रांतील संसर्ग झालेल्या व्यक्तींची ओळख करण्यास मदत करू शकते. तसेच आयआयटी मुंबईचे विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांच्या एका टीमने ‘क्वॉरंटीन’ नावाचे एक मोबाइल अॅप बनवले आहे. हे अॅप करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या किंवा थोडे लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या संसयित व्यक्तींना ट्रॅक करण्याचे काम करणार आहे.

डॉक्टरांसाठी खास तंबू

आयआयटीचे रोपडचे प्राध्यपक धीरज कुमार महाजान यांनी कोरोना व्हायरपासून बचाव करण्यासाठी दक्षिण कोरियासारखा एक तंबू बनवला आहे. करोना व्हायरस या तंबूत बाहेर येणार नाही. जी हवा या तंबूतून बाहेर पडेल ती पूर्णपणे ट्रिट होऊन बाहेर पडेल, असा प्राध्यापकाने दावा केला आहे. कोरियाने सुद्धा अशीच टेस्टिंग बनवली आहे. व्हायरसला रोखण्यासाठी त्यांना यश आले आहे.