घरदेश-विदेशरेल्वेसाठी 'त्याने' चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच केली तक्रार!

रेल्वेसाठी ‘त्याने’ चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच केली तक्रार!

Subscribe

याअगोदर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, दोघांनीही दुर्लक्ष केल्यामुले एका प्रवाश्याने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार केली आहे.

रेल्वे स्थानकावर गाडी थांबावी म्हणून दिल्लीच्या एका प्रवाश्याने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केली आहे. या प्रवाश्याचे नाव बालकृष्ण अमरसारिया असे आहे. त्याने ही विनंती ट्विटरवरमार्फत केली आहे. आपण ही तक्रार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील केली असल्याचे त्याने म्हटले आहे. परंतु, आपल्या तक्रारीकडे दोघांनीही लक्ष दिले नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या या तक्रारीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्ष देऊन याप्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना केली आहे.


हेही वाचा –  लघुशंकेसाठी थांबवली गांधीधाम एक्सप्रेस

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या कित्येक वर्षांपासून चेतक एक्सप्रेसला पालम रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी संघटनांडून केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासन आणि सरकारने काना डोला केला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या एका प्रवाश्याने खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे रेल्वे थांब्याची तक्रार केली आहे. बालकृष्ण अमरसारिया याने ट्वीटरमार्फत ही तक्रार केली आहे. चेतक एक्सप्रेस ही गाडी दररोज दिल्लीच्या सराय रोहिल्ला या रेल्वे स्थानकाहून सुटते. ती राजस्थानच्या उदयपूरला जाते. ही गाडी कॅंट रेल्वे स्थानकानंतर गुरुग्राम रेल्वे स्थानकावर थांबते. यादरम्यान पालम रेल्वे स्थानकावरही प्रवाश्यांची गर्दी असते. या स्थानकावरही गाडीला थांबा मिळावा, यासाठी प्रवासी संघटना कित्येक दिवसांपासून तक्रार करत आहेत. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार केली आहे.


हेही वाचा – नव्या रुपातील प्रगती एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -