संपुआतर्फे मार्गारेट अल्वांकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल; राहुल गांधी, शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केलेल्या मार्गारेट अल्वा या गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या काँग्रेस नेत्यांच्या पिढीतील आहेत

Indian vice-presidential election 2022 Opposition candidate Margaret Alva files nomination papers

विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, शिवसेना नेते संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षनेते उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केलेल्या मार्गारेट अल्वा या गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या काँग्रेस नेत्यांच्या पिढीतील आहेत. 1969 मध्ये इंदिरा गांधींशी एकनिष्ठ राहून त्यांनी काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश केला. गांधी घराण्याशी गेली चार दशके ते एकनिष्ठ राहिल्या आणि या काळात त्यांना त्याचा पुरेपूर फायदाही झाला. 1974 ते 1998 पर्यंत पक्षाने त्यांना सतत राज्यसभेवर पाठवले. यानंतर 1999 ते 2004 पर्यंत त्या लोकसभेच्या सदस्य होत्या. एकेकाळी त्यांनी कॅबिनेटवर मंत्री पदबही भूषविले आहे. मात्पर 2004 लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांना राज्यपाल पद देण्यात आले.

हेही वाचा : राष्ट्रपती निवडणूक : मतपेट्या हवाई आणि रस्ते मार्गाने दिल्लीत

2008 मध्ये सोनिया गांधींसोबत मतभेद

मात्र 2008 मध्ये पहिल्यांदाच मार्गारेट अल्वा यांचे तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद झाले. यानंतर अल्वा यांनी कर्नाटकातील पक्ष नेतृत्त्वार तिकीट विकल्याचा जाहीर आरोप केला. यावेळी अल्वा यांचा मुलगा निवेदित अल्वा यांना तिकीट देण्यास प्रदेश नेतृत्ताने नकार दिला होता.


हेही वाचा : राष्ट्रपती निवडणूक: शिंदे गटाला मोठा धक्का, एका आमदाराच्या मतदानावर बंदी

मतभेदानंतर दिला राजीनामा

यावेळी मार्गारेट अल्वा यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. काही काळानंकर त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उत्तराखंडचे राज्यपाल करण्यात आले. यावेळी त्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांचा दुसरा मुलगा निखिल अल्वा हा राहुल गांधींच्या जवळचा मानला जातो. काँग्रेसचे प्रचार विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आपली उमेदवारी देशाच्या विविधतेचे प्रतिनिधित्व असल्याचे म्हटले आहे.


शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला दणका; अजित पवारांनंतर ‘यांचा’ निधी रोखला