Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशWeather Update : देशातील वातावरणात मोठे बदल; काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी हिमवृष्टी

Weather Update : देशातील वातावरणात मोठे बदल; काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी हिमवृष्टी

Subscribe

मुंबईसह देशभरातील वातावरणात शुक्रवारी (21 फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Update News मुंबई : मुंबईसह देशभरातील वातावरणात शुक्रवारी (21 फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे ओडिशामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Indian Weather Update Heavy Rain fall and Snow Fall Toadys Weather Update News In Marathi)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी 13 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशामध्ये पुढील तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ओडिशा सरकारनं 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी (20 फेब्रुवारी) दिल्ली, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस झाला. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाच्या काही भागातही जोरदार हिमवृष्टी झाली. काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 300 वाहने अडकून पडली. नचिलाना, शेरबीबी आणि बनिहाल-काझीगुंड चौपदरी बोगद्यात अडकलेल्या वाहनांची सुटका करण्यात येत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय, राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर तापमानात घट झाली आहे. परिणामी पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. मात्र, 22 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा हवामानात बदल होणार असून, तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 25-26 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवसा उष्मा वाढू शकतो. बाडमेर आणि जालोर भागात पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो. हवामानातील या चढउतारांमुळे राज्यात हंगामी आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी अजमेर, अलवर, जयपूर, पिलानी, सीकर, जैसलमेर, फलोदी, बिकानेर, चुरू, नागौर, गंगानगर, बारन, हनुमानगड, सिरोही आणि करौली येथे कमाल दिवसाचे तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गुरुवारी चित्तोडगडमध्ये सर्वाधिक तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

याशिवाय, पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत सरासरी कमाल तापमानात 4.7 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, राज्यात ते सामान्यपेक्षा 1.8 अंश सेल्सिअस कमी आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान भटिंडा येथे 25.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

गेल्या 24 तासांत पंजाबमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अमृतसरमध्ये 36 मिमी, लुधियानामध्ये 6, पटियालामध्ये 9, फरीदकोटमध्ये 11, होशियारपूरमध्ये 15.5, एसबीएस नगरमध्ये 5.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.


हेही वाचा – Ganesh Utsav 2025 : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त मंडपासाठी खणलेल्या प्रत्येक खड्ड्यावर आता 2000 रुपयांचा दंड