घरदेश-विदेशब्रिटन सरकारकडून भारतीयांना अटक, वाचा.. काय आहे प्रकरण?

ब्रिटन सरकारकडून भारतीयांना अटक, वाचा.. काय आहे प्रकरण?

Subscribe

यूकेमध्ये अन्न पुरवठा कंपन्यांसाठी बेकायदेशीरपणे काम केल्याबद्दल साठ मोपेड डिलिव्हरी चालकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये अन्न पुरवठा कंपन्यांसाठी बेकायदेशीरपणे काम केल्याप्रकरणी साठ मोपेड डिलिव्हरी चालकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदेशीर इमिग्रेशनविरोधात आठवडाभर चाललेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. स्वतः ब्रिटन सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी चालकांमध्ये भारतीयांव्यतिरिक्त ब्राझिलियन आणि अल्जेरियन नागरिकांचाही समावेश आहे. बेकायदेशीर काम करणे आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

ब्रिटनच्या गृहविभागाने मंगळवारी याबाबतची आकडेवारी जाहीर करत सांगितले की, भारतीय आता छोट्या बोटीतून बेकायदेशीरपणे इंग्लिश खाडीा ओलांडणाऱ्या स्थलांतरितांचा दुसरा सर्वात मोठा गट बनला आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या महिन्यांत 675 स्थलांतरित लोकांचा आकडा नोंदवला गेला आहे.

गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी सांगितले की, बेकायदेशीर कामामुळे आपल्या समुदायांचे नुकसान होत आहे. यामुळे प्रामाणिक कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवले जात असून सार्वजनिक तिजोरीची फसवणूक होत आहे. तर ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी सांगितले आहे की, काही नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या सीमांचा दुरुपयोग थांबवण्यासाठी आम्ही अधिक वेगाने पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ३३०० कोटींची गुंतवणूक, महिंद्राची गुंतवणूक वाढ ते पांजरपोळ; उद्योगमंत्री सामंत यांनी दिली नाशिकला खुशखबर

ब्रेव्हरमन यांनी सांगितले की, ब्रिटीश जनता न्याय्य आणि प्रामाणिक असलेल्या श्रमिक बाजारपेठेनुसार काम करते आणि त्यांना विश्वास आहे की त्यांचे नागरिक हे कायदेशीर व्यवसायांमधून सर्व वस्तू खरेदी करतात. एडी मॉन्टगोमेरी या गृह कार्यालयातील अंमलबजावणी, अनुपालन आणि गुन्हेगारीचे संचालक असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आमची अंमलबजावणी पथके इमिग्रेशन गुन्हे थांबवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणारे वर्तन बदलण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. त्यांच्या टीमने Deliveroo, JustRight आणि UberEats सारख्या कंपन्यांसाठी बेकायदेशीरपणे काम करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कारवाई वाढवली आहे, अशी माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

इमिग्रेशन अंमलबजावणी कार्यालयाने बेकायदेशीर मोपेड डिलिव्हरी चालकांवर कारवाई करण्याआधी त्यांच्या ठिकाणांची माहिती जाणून घेतली. तसेच या प्रकरणी कारवाई सुरू करण्यापूर्वी विस्तृत गुप्त माहिती गोळा केल्याचे देखील सांगण्यात आले आहे. ब्रिटन सरकारने सांगितले की ते बेकायदेशीर पद्धतींवर कारवाई करत आहेत, कारण इतर सर्व कंपन्या आणि त्या कंपन्यांमध्ये काम कर्मचारी हे कर भरून आणि इतर नियमांचे पालन करून अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -