स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात एका वर्षात 50 टक्क्यांची वाढ; 14 वर्षांतील ही सर्वांधिक वाढ

स्वित्झर्लंडमध्ये 400 पेक्षा जास्त बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना स्विस फेडरल बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्याच्या कलम 47 अंतर्गत बँक खाती उघडण्याचा अधिकार आहे.

indians money in swiss bank increased by 50 percent black money is not all money deposits reached the highest level of 14 years

स्वित्झर्लंडच्या बँकांमधील भारतीय कंपन्या आणि व्यक्तींच्या संपत्तीत एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही संपत्ती आता 3.83 अब्ज स्विस फ्रँक (रु. 30,500 कोटींहून अधिक) घरात पोहचली आहे. 2021 या वर्षांत झालेली वाढ 14 वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे. यात भारतात स्विस बँका आणि इतर वित्तीय संस्थ्यांच्या शाखांमध्ये जमा केलेल्या पैशांचाही समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने (SNB) गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, रोख्यांसह संबंधित साधनांद्वारे स्टेक आणि ग्राहकांच्या ठेवींमध्ये वाढ झाल्यामुळे स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा वाढला आहे.

याप्रकारे वाढतोय पैसा

यापूर्वी 2020 च्या अखेरीस स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा 2.55 अब्ज स्विस फ्रँक (20,700 कोटी रुपये) होता. आकडेवारीनुसार, 2021 च्या अखेरीस भारतीय ग्राहकांवरील स्विस बँकांचे एकूण दायित्व 383.19 कोटी स्विस फ्रँक होते. यापैकी 60.20 कोटी फ्रँक ग्राहकांच्या ठेवींच्या स्वरूपात आहेत. 1225 कोटी स्विस फ्रँक इतर बँकांमार्फत आणि 30 लाख फ्रँक ट्रस्ट इत्यादींमार्फत ठेवल्या जातात.

SNB ची आकडेवारी नेमकी काय सांगते?

स्वित्झर्लंडच्या बँकांनी ही आकडेवारी SNB ला दिली आहे. मात्र ही आकडेवारी स्विस बँकेतील भारतीयांचा कथित काळा पैसा दर्शवत नाहीत. तसेच या आकडेवारीमध्ये भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी स्विस बँकेत कोणत्याही तिसऱ्या देशाच्या नावाने ठेवलेल्या पैशांचा उल्लेख नाही.

स्विस सरकार आपल्या देशातील बँकांमध्ये जमा असलेल्या भारतीयांच्या पैशाला ‘काळा पैसा’ मानत नाही. स्वित्झर्लंडने करचुकवेगिरीविरोधातील लढाईत भारताला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे. 2018 पासून भारत आणि स्वित्झर्लंडमधील करविषयक बाबींमध्ये माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्याची प्रणाली लागू आहे. यामुळे प्राथमिक पुरावे सादर केल्यास स्विस सरकार आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय असलेल्या भारतीयांची तपशीलवार खात्यांची माहिती संबंधित यंत्रणांना देते. या माहितीच्या अशा देवाणघेवाणमुळे आतापर्यंत शेकडो आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरण समोर आली आहेत.

ब्रिटनचा सर्वाधिक पैसा

ब्रिटनचे स्विस बँकेत 379 अब्ज फ्रँक आहेत, जे सर्वाधिक आहे. यानंतर अमेरिकेच्या ग्राहकांचे स्विस बँकांमध्ये 168 अब्ज फ्रँक जमा आहेत. 100 अब्जांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ग्राहकांच्या यादीमध्ये फक्त अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश आहे.

भारत 44 व्या स्थानी

वेस्ट इंडीज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग, लक्झेंबर्ग, बहामास, नेदरलँड, केमन आयलंड आणि सायप्रस हे स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या देशांपैकी आघाडीवर आहेत. या यादीत भारत 44 व्या क्रमांकावर आहे. भारत पोलंड, स्वीडन, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या पुढे आहे.

स्विस बँक म्हणजे काय?

स्वित्झर्लंडमध्ये 400 पेक्षा जास्त बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना स्विस फेडरल बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्याच्या कलम 47 अंतर्गत बँक खाती उघडण्याचा अधिकार आहे. वास्तविक यूबीएस ही जगभरात स्विस बँक म्हणून ओळखली जाते. जगातील पहिल्या तीन बँकांपैकी ती एक आहे. त्याचे मुख्यालय झुरिच आणि बासेल, स्वित्झर्लंड येथे आहेत. या बँकांकडून गुप्तता काटेकोरपणे पाळली जाते. त्यानुसार स्वित्झर्लंडमध्ये कोणी गुन्हा केला नसेल तर बँक त्याबाबत कोणतीही माहिती जाहीर करत नव्हते. सरकारला देखील ही माहिती दिली जात नव्हती.मात्र 2017 मध्ये जागतिक समुदायाने स्वित्झर्लंडवर दबाव आणून हा कायदा शिथिल केला. आता स्विस बँकांच्या नियमांत बदल येऊ लागला आहे.कांजुरमार्ग कोरोना केंद्र बंद होणार; वैद्यकीय साहित्य अन्यत्र हलविणार