Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारताचे खाता आणि..., बाबा रामदेव यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा

भारताचे खाता आणि…, बाबा रामदेव यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपावर केलेल्या वक्तव्यावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी राहुल गांधींवर टीका केली. भारतातील अन्न खाण्याची आणि जगभरातील इतर देशांची गाणी गाण्याची काही लोकांची प्रवृत्ती असल्याचे बाबा रामदेव म्हणाले आहेत.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेताना रामदेव बाबा म्हणाले की, असे करून हे लोक देशात अस्वीकृती आणि द्वेषाची भावना निर्माण करतात. राजकारण्यांनी अशा गोष्टी अजिबात करू नये, असेही सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.

- Advertisement -

ज्यांना भारतातील जनतेची मते घेऊन नेते व्हायचे आहे, ते लोक परदेशात जाऊन असे वक्तव्य कसे काय करू शकता. हा विचार करून मला त्याच्या बुद्धिमत्तेची खंत वाटते. समाजात अनेक प्रकारची हिंसा, घृणा आणि द्वेष आहे. हे कोणत्याही देशासाठी चांगले नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, आपण सर्व एकाच पूर्वजाची आणि देवाची लेकरे आहोत. जाती आणि पंथाच्या नावावर होणारी फाळणी संपली पाहिजे हा होळीचा संदेश त्यांनी श्री दक्षिण काल मंदिर घाटावर दिला.

योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी बुधवारी श्री दक्षिण काली मंदिर घाटावर पतंजली योगपीठाच्या विविध आखाड्यांच्या संतांसह होळीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींवर टीका केली.

- Advertisement -

राहुल गांधी काय म्हणाले होते
भारतातील लोकशाही प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरएसएस नावाची संघटना आहे, जी एक कट्टरवादी आहे. मुळात मोदी सरकारने भारतातील सर्व संस्था ताब्यात घेतल्या असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की, आपल्या देशातील विविध संस्था ताब्यात घेण्यात मोदी सरकार किती यशस्वी झाले आहे. प्रेस, न्यायपालिका, संसद आणि निवडणूक आयोग हे सर्वच या ना त्या कारणाने धोक्यात आहेत.
भारतात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठी काय काहीच केले जात नाही. हे काँग्रेस म्हणत नाही तर भारतीय लोकशाहीत एक गंभीर समस्या आहे, असे लेख परदेशी माध्यमांमध्ये सतत येत असतात, असेही राहुल गांधी म्हणाले. एजन्सी कशा वापरल्या जातात हे तुम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याला विचारू शकता. माझ्या फोनमध्ये पेगासस होते, हे तेव्हा झाले नाही जेव्हा आम्ही सत्तेत होतो.

- Advertisment -