घरCORONA UPDATECoronaVirus: देशात बाधितांचा आकडा ३३ लाखांपार! २४ तासांत ७५,७६० नवे रूग्ण

CoronaVirus: देशात बाधितांचा आकडा ३३ लाखांपार! २४ तासांत ७५,७६० नवे रूग्ण

Subscribe

देशात २४ तासात ७५ हजार ७६० नव्या रूग्णांची नोंद

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सातत्याने वाढतांना दिसत आहे. दररोज जगातील सर्वात नवीन कोरोनाचे रुग्ण भारतात आढळले येत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३३ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ७५ हजार ७६० नवे रूग्ण आढळले असून १ हजार २३ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

देशात २४ तासात ७५ हजार ७६० नव्या रूग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोना बाधितांचा आकडा हा ३३ लाख १० हजार २३५ वर पोहोचला आहे. तर ६० हजार ४७२ जणांचा जीवघेण्या कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशात ७ लाख २५ हजार ९९१ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे २४ लाख ६० हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२४ तासात ९ लाख २४ हजारांहून अधिकांनी केली टेस्ट

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. तर या चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहेत. देशात आता पर्यंत ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० इतक्या जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे तर २६ ऑगस्ट रोजी दिवसभरात गेल्या २४ तासात ९ लाख २४ हजार ९९८ जणांनी आपली कोरोना चाचणी करून घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती ICMR ने दिली आहे.


अमेरिकन कोरोना लसीच्या चाचणीनंतर Moderna कंपनीने दिली Good News!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -