घरCORONA UPDATEधक्कादायक! लॉकडाऊन अखेरीस कोरोनाची संख्या १० हजारपर्यंत जाणार

धक्कादायक! लॉकडाऊन अखेरीस कोरोनाची संख्या १० हजारपर्यंत जाणार

Subscribe

२१ दिवसाच्या लॉकडाऊन अखेरीस तब्बल १० हजार रुग्णांना कोरोनाची लागण होणार असल्याचे समोर आले आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या देशात २ हजार ३२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भारतातील कोरोनाची संख्या दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या गुरुवारी देशातील कोविड -१९ ची संख्या ७०० पेक्षा कमी होती. मात्र, या गुरुवारी कोरोनाची संख्या २ हजार एवढी झाली आहे. तर यामध्ये आतापर्यंत ५८ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता देशावर कोरोनाचे सावट अधिकच वाढले आहे.

कोरोनाबाधितांमध्ये वाढ

हिंदुस्तान टाइम्स बिजनेस पब्लिकेशन मिंटच्या माहितीनुसार, २१ दिवसाचा लॉकडाऊन संपेपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात देशात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसणार आहे. त्यामुळे आता सरकार देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील आता खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाचा प्रभाव कमी करण्याविषयी बोलताना सांगितले की, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी अजून २ ते ४ आठवडे लागू शकतात. तसेच आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केले की ३१ मार्च ते १ एप्रिल दरम्यान, भारतात ४३७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या १२ तासात देशभरात १३१ नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याचप्रमाणे भारतात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमधील बहुतेक रुग्ण हे बाहेरुन आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचा अद्याप सामुहिक प्रसार झालेला दिसत नाही. एखादा असा रुग्ण आढळून आला आहे, जो बाहेरुन आलेला नाही. तरी देखील त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा एक उत्तम पर्याय आहे’.


हेही वाचा – Lockdown नंतर पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा देशाला संबोधित करणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -