Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Second Wave Peak : भारतात 'या' कालावधीत कोरोना दुसऱ्या लाटेचा Peak...

Corona Second Wave Peak : भारतात ‘या’ कालावधीत कोरोना दुसऱ्या लाटेचा Peak Period ? IIT च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उपस्थितीत झाला आहे की, कोरोनाची महामारी केव्हा संपुष्टात येईल? अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढेल का? पण यादरम्यानच कोरोनाच्या दुसऱ्या लहरीचे पीक कधी येईल? याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)चे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. वैज्ञानिकांनी आपल्या गणितीय मॉडेलच्या आधारे अंदाज लावला आहे की, ‘भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे पीक ११ ते १५ मे दरम्यान येईल.’

वैज्ञानिकांने सांगितले की, ‘दुसऱ्या लाटेच्या पीक दरम्यान देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ ते ३५ लाखांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मेच्या अखेरपर्यंत झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या कमी होईल.’ देशात आज (शुक्रवार) एक दिवसात ३ लाख ३२ हजार ७३० नवे प्रकरणे आढळली तर २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला. तसेच सध्या देशात २४ लाख २८ हजार ६१६ जणांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

आयआयटी (IIT) कानपुर आणि हैदराबादच्या शास्त्रज्ञांनी दहा ससेक्टिबल, अनडिटेक्ड, टेस्टड (पॉझिटिव्ह) आणि रिमूव एप्रोच (फॉर्म्युला) मॉडेलवर आधारित असा अंदाज लावला की, ‘मेच्या मध्यापर्यंत रुग्णांची संख्या कमी होण्यापूर्वी उपचार घेणार असलेल्या रुग्णांची संख्या १० लाखांपर्यंत वाढू शकते.’

पुढे वैज्ञानिक अजून सांगितले की, ‘दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये २५ ते ३० एप्रिलदरम्यान विक्रमी वाढ होईल. तर महाराष्ट्रात आणि छत्तीसगढमध्ये याची शक्यता आहे कारण येथे यापूर्वी; नवी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.’


- Advertisement -

हेही वाचा – Corona Treatment: फक्त ७ दिवसात कोरोनावर मात, Zydus Cadila च्या औषधाला DGCI ची मंजूरी


 

- Advertisement -