घरताज्या घडामोडीCorona Vaccine: भारताने लस निर्यातीवर बंदी घातल्यामुळे ९१ देशांना झटका - WHO

Corona Vaccine: भारताने लस निर्यातीवर बंदी घातल्यामुळे ९१ देशांना झटका – WHO

Subscribe

आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा धोका जास्त वाढला.

देशात दोन लसीचे उत्पादन होत असल्यामुळे अनेक देशांना लस निर्यात करण्यात येत होती. पण कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे भारताने लस निर्यातीवर बंदी लादली. पण भारताने लस निर्यातीवर बंदी घातल्यामुळे ९१ देशांना याचा फटका बसला आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे. खास करून आफ्रिकन देशांना फटका बसला असून येथे कोरोनाच्या B.1.617.2 व्हेरियंटचा धोका वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, ‘जगातील ९१ देशांमधील लसीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारताने बंदी घातल्यानंतर एस्ट्राजेनेकाच्या मूळ कंपनीकडून भरपाई न मिळाल्यामुळे हे घडले आहेत.’

‘९१ देशांमध्ये या नव्या व्हेरियंट व्यतिरिक्त कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला आहे. भारताकडून मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना कोरोना लसीचा पुरवठा केला जात होता. परंतु भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लसीचा पुरवठा करणारे मिशन रोखले गेले. यामुळे आफ्रिकन देशांमध्ये कोरोना धोका जास्त वाढत आहे. त्यामुळे या देशांतील ०.५ टक्के जनतेचे कोरोना लसीकरण करू शकले नाहीत. एवढेच नाहीतर यादरम्यान सर्व आरोग्य कर्मचारी येऊ देखील शकले नाहीत,’ असे सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

- Advertisement -

पुढे स्वामीनाथन म्हणाल्या की, ‘जर कोरोना लसीच्या पुरवठ्यात इतके अंतर झाले तर येणाऱ्या दिवसात मोठी असमानता निर्माण होईल. एका बाजूला कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे काही देश सामान्य जीवनात परत जाताना दिसतील तर काही देशांमध्ये कोरोनाचा भीषण कहर होईल.’ दरम्यान भारतात लस खरेदीवरून सरकारवर टीका केली जात आहे. लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे सरकारवर निशाणा साधला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत असल्यामुळे काही देशांनी लस निर्यातीवर बंदी घातली. प्रथम आपल्या देशांतर्गत लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – Covid-19 Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ कोटी भारतीय झाले बेरोजगार

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -