Corona: देशात २४ तासांत ७७ हजार नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३३ लाख ८७ हजारांवर!

भारतात गेल्या २४ तासांत ७७ हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३३ लाख ८७ हजार वर पोहचला आहे.

India Corona Update:
India Corona Update:

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत ७७ हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३३ लाख ८७ हजार वर पोहचला आहे. दरम्यान, भारतात ३३ लाख ८७ हजार ५०१ कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या ७ लाख ४२ हजार २३ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

२५ लाख जण कोरोनामुक्त

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीही आकडेवारी अधिक आहे. आतापर्यंत भारतात २५ लाख ८३ हजार ९४८ जणांना कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ६१ हजार ५२९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जगात २ कोटीहून अधिक जण कोरोनाबाधित

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची जगातील संख्या आता २ कोटीवर गेली आहे. सध्या जगात २ कोटी ४६ लाख २८ हजार १९० जण कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत ८ लाख ३५ हजार ६२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ७ लाख ९४ हजार २५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ६ कोटी ६ लाख ९८ हजार ३०४ Active रुग्ण आहेत.


हेही वाचा – Intas pharma करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी