घरCORONA UPDATECorona: देशात २४ तासांत १,०६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू!

Corona: देशात २४ तासांत १,०६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशात ७९ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ७३ हजार ५४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५४ लाख २७ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे चाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. २ ऑक्टोबरपर्यंत देशात ७ कोटी ७८ लाख ५० हजार ४०३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ११ लाख ३२ हजार ६७५ कोरोनाच्या चाचण्या शुक्रवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान जगातील कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४८ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १० लाख ३३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी ५८ लाख ९५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास रस्ता बनवणाऱ्या कंपनीला होणार १ लाखांचा दंड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -