घरताज्या घडामोडीCoronavirus: २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३९ लाखावर

Coronavirus: २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३९ लाखावर

Subscribe

गेल्या २४ तासात ८३ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ८३ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३९ लाखांवर गेली आहे. तर ६८ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधितांचा आकडा ३९ लाखा पार

भारतात गेल्या २४ तासात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३९ लाख ३६ हजार ७४८ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३० लाख ३७ हजार १५२ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर भारतात सध्या ८ लाख ३१ हजार १२४ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत असून सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होत आहे. आज राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत राज्यात १८ हजार १०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २५ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजाक ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.५८ टक्के एवढे झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०३ टक्के एवढा आहे

- Advertisement -

हेही वाचा – LIVE UPDATES: सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा एनसीबीच्या ताब्यात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -