घरCORONA UPDATECorona Update : चिंताजनक! देशात आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा मृत्यू

Corona Update : चिंताजनक! देशात आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६३ लाख ९४ हजार ०६९ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत ८१ हजार ४८४ रुग्णांची वाढ झाली असून १ हजार ०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आता ९ लाख ४२ हजार २१७ इतके अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ इतक्या जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९९ हजार ७७३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे, ही माहिती आरोग्य मंत्रालायने दिली.

- Advertisement -

सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशात १० लाख ९७ हजार ९४७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसंच आतापर्यंत देशभरात ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात १६ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाख ९२२ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात २ लाख ५९ हजार ६ Active रुग्ण आहेत.

हेही वाचा –

Covid-19 in US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया क्वारंटाइन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -