घरअर्थजगतविकासदरात घट अपेक्षित असली तरी भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, आयएमएफचा अंदाज

विकासदरात घट अपेक्षित असली तरी भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत, आयएमएफचा अंदाज

Subscribe

नवी दिल्ली : कोरोना काळानंतर जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. अशातच 2023मध्ये इतर देशांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेलाही सौम्य मंदीचा सामना करावा लागू शकतो. तथापि, इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) चांगल्या स्थितीत असेल. आर्थिक वर्ष 2023मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवरून 6.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी वर्तविली असली तरी आयएमएफच्या नव्या यादीवर नजर टाकली तर इतर देशांच्या तुलनेत भारत अजूनही आघाडीवर आहे.

आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकनुसार, जागतिक वृद्धीदर 2022मध्ये वर्तवलेल्या अंदाजे 3.4 टक्क्यांवरून 2023मध्ये 2.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर 2024मध्ये तो वाढून 3.1 टक्क्यांपर्यंत जाईल. 2023 मध्ये अमेरिकेचा (USA) विकास दर 1.4 टक्के असण्याची शक्यता आहे, तर ब्रिटनची (UK) अर्थव्यवस्था उणे 0.6 टक्का राहण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

उदयोन्मुख आणि विकसनशील आशियातील (Asia) विकासदर 2023 आणि 2024मध्ये अनुक्रमे 5.3 टक्के आणि 5.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तर, ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी भारताचा विकास दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु त्यानंतर 2023च्या चालू आर्थिक वर्षात तो 6.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. संशोधन विभाग आणि संचालक पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सन 2022मध्ये चीनचा विकासदर (China growth rate) 4.3 टक्क्यांवर आला आहे. आयएमएफने 2023मध्ये चीनचा विकास दर वाढण्याची आशा व्यक्त केली आहे. 2023मध्ये चीनचा विकास दर 5.2 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तथापि, 2024 मध्ये हा दर पुन्हा एकदा 4.5 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, वर्ष 2022च्या चौथ्या तिमाहीत, चीनचा वास्तविक जीडीपी तीन टक्क्यांपर्यंत घसरल्याने मोठा धक्का बसला.

हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारची बसला धडक, चार ठार; महिन्याभरात दुसरा अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -