घरदेश-विदेशदिल्लीत पहिल्यांदा FASTag कार पार्किंग सुरू; टोल प्लाझाप्रमाणे सेकंदात भरले जाणार पैसे

दिल्लीत पहिल्यांदा FASTag कार पार्किंग सुरू; टोल प्लाझाप्रमाणे सेकंदात भरले जाणार पैसे

Subscribe

मुंबई, पुणे आणि नवी दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्या सामान्य आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पार्किंगमधील एका आव्हानाचा सामना करण्यासाठी एक नवीन उपाय आणला आहे, जो दिल्लीसारख्या मोठ्या आणि गर्दी असलेल्या शहरात खूप फायदेशीर ठरणार आहे.

कुठे असणार फास्टॅग पार्किंग उपलब्ध

डीएमआरसीने भारताची पहिली FASTag वर आधारित पार्किंग सुविधा सुरू केली आहे, जी आता काश्मिर गेट मेट्रो स्टेशनवर उपलब्ध असणार आहे. आता टोल प्लाझा प्रमाणेच FASTag च्या माध्यमातून तुम्हाला नवी दिल्लीच्या काश्मिर गेट मेट्रो स्टेशनवर पार्किंगसाठी पैसे देता येणार आहे. ही सेवा वाहन मालकास यूपीआयद्वारे देखील पैसे भरण्याची परवानगी देते. या सुविधेचा लाभ मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर 6 वर मिळणार असून येथे 174 दुचाकी आणि 55 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे.

- Advertisement -

FASTag द्वारे फक्त कार पार्किंगचे पैसे घेतले जाऊ शकतात, कारण जे लोक दुचाकी चालवितात त्यांना अद्याप FASTag च्या विभागात स्थान दिले गेले नाही, परंतु काळजी करण्याची गरज नाही बाइक आणि स्कूटरसाठी तुम्ही यूपीआय अॅपवरुन तुम्ही तुमची पार्किंग फी भरू शकणार आहात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कॅशलेस पार्किंग प्रकल्प सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. आम्ही हा प्रकल्प म्हणून घेतला आहे. अशाच प्रकारच्या योजनांची योजना स्थानकांवर अधिक पार्किंग सुविधा आखणार आहोत.

“खरं तर जिथे जिथे संधी असेल तिथे आम्ही डिजिटल सुविधा देण्यास अधिक संधी शोधण्यात येईल. यामुळे केवळ सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात मदत होणारच नाही तर प्रवाशांना त्यांचा वेळ वाचविण्यात आणि प्रक्रिया सुकर करण्यास मदत होणार आहे.”

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -