घरदेश-विदेशसमानतेचा संदेश घेऊन बाप - लेकीने केला एव्हरेस्ट सर

समानतेचा संदेश घेऊन बाप – लेकीने केला एव्हरेस्ट सर

Subscribe

तिबेटियन बाजूने दोघांनीही एव्हरेस्ट केला सर

 

अजित बजाज आणि दीया बजाज ही भारतातील वडील – मुलीची जोडी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली जोडी ठरली आहे. १६ मे रोजी या दोघांनीही माऊंट एव्हरेस्ट सर केला असून पहाटे ४.३० वाजता दीया पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्टवर पोचली तर तिच्यानंतर १५ मिनिटांनंतर तिचे वडील अजित बजाज यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला.
तिबेटियन बाजूने अजित आणि दीया यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला. समानतेचा संदेश घेऊन ही जोडी २० मे रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे परत आली. काठमांडूला परत आल्यानंतर भारताचे नेपाळमधील राजदूत मंजीव पूरी यांनी या जोडीचे स्वागत केले. एव्हेरेस्ट सर करण्याची दीयाची संकल्पना होती आणि तिच्या वडिलांनी तिला यामध्ये पुरेपूर साथ दिली.
यासंदर्भात एनएआयला अजित बजाज यांनी सांगितले की, “मुली या खूप विशेष असतात, त्यांची काळजी घ्यायला हवी, त्यांना प्रेम करून जपायला हवं आणि त्यांची स्वप्नं करण्यात त्यांना साथ द्यायला हवी.” तर संधी मिळाल्यास मुली नक्कीच उंची गाठू शकतात हा संदेश दीयाला पोचवायचा होता. तिने सांगितले की, “मला असे पालक मिळाले हे माझे भाग्य समजते, मी जे करते त्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. भारतातील मुलींना मुलांपेक्षा फार कमी संधी मिळते. विशेषतः अॅडव्हेंचर टूरिझममध्ये हे मुलांचे क्षेत्र मानले आहे असे मानले जाते. त्यामुळे मला फार आनंद होतोय. ”
दियाने कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ती सध्या आपल्या आईवडिलांचा अॅडव्हेंचर टूरिझमचा व्यवसाय चालवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -