देशातले पहिले Grain ATM, एका मिनिटात येणार १० किलो गहू

'राईट क्वान्टिटी टू राईट बेनिफिशरी' हा या अँटोमॅटीक धान्याच्या ATMचा मुख्य उद्देश

india's first Grain ATM, 10 kg of wheat will arrive in minute in gurugram hariyana
देशातले पहिले Grain ATM, एका मिनिटात येणार १० किलो गहू

देशात अनेक नागरिकांना रेशनच्या माध्यमातून धान्य मिळते. मात्र त्यातही अनेकदा गोंधळ आणि फसवणूक केली जाते. ही फसवणूक कमी करण्यासाठी हरयाणा गुरुग्राम येथे एक भन्नाट शक्कल लढवण्यात आली. धान्य घेण्यासाठी थेट ध्यान्याचे ATM च सुरु करण्यात आले आहे.  ‘अन्नपूर्ती’ नावाने सुरु केलेले धान्याचे हे ATM देशातील पहिले धान्याचे ATM ठरले आहे. येथे केवळ आधार क्रमांक टाकून धान्य घेता येणार आहे. या धान्याच्या ATM मधून एका वेळी १ किलो धान्य घेता येणार आहेत. (india’s first Grain ATM, 10 kg of wheat will arrive in minute in gurugram hariyana) त्यामुळे गुरुग्रामधील नागरिकांना धान्य घेण्यासाठी रेशन दुकानांच्या बाहेर रांगा लावण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे या धान्याच्या ATMमुळे धान्य घेताला वजनाच्या तक्रारी देखील कमी होणार आहेत.

‘राईट क्वान्टिटी टू राईट बेनिफिशरी’ हा या अँटोमॅटीक धान्याच्या ATMचा मुख्य उद्देश असल्याचे हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत ही मशिन तयार करण्यात आली असून, या मशिनला अँटोमॅटिक मल्टी कमोडिटी धान्य वाटप मशीन असे म्हटले गेले आहे. या धान्याच्या ATMमुळे रेशनच्या दुकानांवर नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आणखी सुलभ  होणार आहेत.

 

Grain ATMचा वापर कसा करायचा?

या Grain ATM मशीनला टचस्क्रिन बायोमॅट्रिक सिस्टिम देण्यात आली आहे. ज्यात धान्य घेण्यासाठी नागरिकांना आपला आधार क्रमांक, रेशनिंग कार्ड क्रमांक तिथे द्यावा लागेल. त्यानंतर Grain ATM मधून नागरिक एका वेळी १ किलो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य विकत घेता येणार आहेत.


हेही वाचा –  ऑगस्टच्या अखेरीस येणार कोरोनाची तिसरी लाट; ICMR चा इशारा