घरताज्या घडामोडीIAC Vikrant: देशातील पहिले स्वदेशी विमानवाहक जहाज 'विक्रांत'चे दुसरे समुद्र परीक्षण...

IAC Vikrant: देशातील पहिले स्वदेशी विमानवाहक जहाज ‘विक्रांत’चे दुसरे समुद्र परीक्षण सुरू

Subscribe

विक्रांत सारख्या मोठ्या युद्धनौका युद्धावेळी भारतासाठी महत्त्वाची ढाल बनू शकतात.

भारतातील पहिले स्वदेशी विमानवाहक जहाज विक्रांतचे दुसऱ्या टप्प्यातील समुद्र परीक्षण सुरू झाले असून २४ ऑक्टोबरला आयएसी विक्रांत कोच्चीहून रवाना झाले आहे.  ८ ऑगस्ट रोजी जहाजाचे पहिले समुद्र परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले होते. विक्रांत २०२२च्या ऑगस्ट महिन्यात भारतीय नौसेनेत दाखल होणार आहे. भारतात तयार झालेले पहिले स्वदेशी जहाज असून याचे वजन सुमारे ४० हजार टन इतके आहे. आयएसी विक्रांत ही देशातील सर्वात मोठी युद्धनौक म्हणून गणली जाते. ही भव्य विक्रांत युद्धनौका तयार करण्यासाठी २३ हजार करोड रुपये खर्च आला होता. विक्रांत तयार झाल्यानंतर भारताचे नाव हे जगातील स्वदेशी आधुनिक विमान वाहक जहाज असणाऱ्या देशांच्या यादीत लिहिले गेले.


आयएसी विक्रांत या युद्धनौकेत मिग-२९ची लढाऊ विमाने त्याचप्रमाणे कामोव-३१ हेलिकॉप्टर आणि एमएच-६० आर बहुउद्देशीय हेलिकॉप्टर कार्यरत होऊ शकतात.आयएसी विक्रांत २६२मीटर लांब आणि ६२ मीटर रुंद आहे. तर जहाजाची उंची ५९ मीटर इतकी आहे. या जहाजात १,७०० लोकांना राहण्यासाठी जवळपास २,३०० रुम तयार करण्यात आले आहेत. खास म्हणजे महिला अधिकाऱ्यांना राहण्यासाठी खास रुम तयार करण्यात आले आहेत. आयएसी विक्रांत २००९मध्ये कोचिनत्या शिपयार्ड लिमिटेडमध्ये सुरू झाले होते.

- Advertisement -

विक्रांत जहाज हे भारतात तयार झालेले सर्वात मोठी आणि विशाल युद्धनौका आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे यात सर्वात मोठे योगदान आहे. भारतीय नौसेना सध्या हिंदी महासागर क्षेत्रात चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या खुसखोरींना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विक्रांत सारख्या मोठ्या युद्धनौका युद्धावेळी भारतासाठी महत्त्वाची ढाल बनू शकतात.

- Advertisement -

आयएसी विक्रांतचे डिझायनर मेजर मनोज कुमार यांनी विक्रांत या विमान वाहक जहाजाविषयी सांगितले होते की, जहाजात आपण स्टिलपासून तीन एफिल टॉवर तयार करू शकतो. जहाजात दोन ऑपरेशन थिएटर्ससोबत पूर्ण पणे क्रियाशील चिकित्सशीय परिसर आहे. जहाजावर जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आलिशान किचन तयार करण्यात आले आहे. किचनमध्ये स्वयंचलित मशीन्स आहेत.


हेही वाचा – गृहमंत्री अमित शहांनी पुलवामा CRPF कँपमध्ये केला मुक्काम; या गंभीर मुद्द्यांवर केली चर्चा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -