घरक्रीडाभारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बालेवाडीत

भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बालेवाडीत

Subscribe

विद्यापीठासाठी सध्या बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधा वापरण्यात येणार आहेत.

भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडी येथे सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी केली. राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भातील अधिनियमाचे प्रारूप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या प्रारूपाला नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बालेवाडी येथे स्थापन करण्यात येणार आहे.

२०२१-२२ मध्ये सुरू होणार्‍या या विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स टेक्नोलॉजी, स्पोर्ट्स गव्हर्निंग, स्पोर्ट्स मॅनेजमेेंट, स्पोर्ट्स मिडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेश आणि स्पोर्ट्स कोचिंग अ‍ॅण्ड ट्रेनिंग हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. विद्यापीठासाठी सध्या बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधा वापरण्यात येणार आहेत. मात्र, विद्यापीठाची स्वतंत्र इमारत आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडून ४०० कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. या विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार २१३ पदे निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -