इस्रो जुलै महिन्यात लॉन्च करणार ‘या’ दोन मोहिमा

आदित्य - एल१ या सूर्याचा अभ्यास करणारी ही भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम असल्याची माहितीही इस्रोने दिली आहे.

मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चंद्रयान -३ मोहीम सुरू करणार आहे. ही चंद्रयान – ३ (Chandrayaan-3) मोहीम येत्या जुलै महिन्यात सुरुवात करण्याची योजना इस्रोने आखल्याची माहिती इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचबरोब इस्रो पहिले सूर्य मिशन देखील सुरू करण्याचा प्रयत्नात आहे. आदित्य – एल१ (Aditya-L1) या सूर्याचा अभ्यास करणारी ही भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम असल्याची माहितीही इस्रोच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

“चांद्रयान-३ जुलै महिन्यात लॉन्च करण्याचे ठरविले आहे. यानंतर आदित्य – एल१ हे देखील लॉन्च करणार आहे. आम्ही दोन्ही मोहिमेच्या सर्व चाचण्या पूर्ण करत आहोत आणि आमची अपेक्षा आहे की, सर्व चाचण्या पार केल्यानंतर यशस्वी उड्डाण करण्यासाठी सज्ज होईल”, अशी माहिती इस्रोच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इस्रोने २०१९ मध्ये चांद्रयान- २चे (Chandrayaan-2)  यशस्वीरित्या पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण केले होते. त्यावेळी चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत पोहोचले देखली होते. परंतु, चांद्रयान-२ च्या लँडर सॉफ्ट वेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्या ६ सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्न असताना ते क्रॅश झाले. यानंतर चांद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल आणि एक रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. या लँडरमध्ये मऊ लँड करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असल्याची माहितीही इस्रोच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या चांद्रयान-३ या मोहिमेसाठी ९ हजार कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

हेही वाचा – चांद्रयान-३: भारताचे यान पुन्हा चंद्राच्या दिशेने झेपावणार

आदित्य-एल १ भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम

आदित्य-एल १ ही पहिली वैज्ञानिक मोहीम असणार आहे. यापूर्वी आदित्य-१ पेलोड, व्हीईएलसी ४०० किलो वर्गाचा उपग्रह आणि ८०० किमी खाली पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची योजना होती. यानंतर आदित्य – १ मिशनचे नाव बदलून आदित्य-एल १ ठेवण्यात आले आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या आदित्य- एल१ त्या कक्षेत ठेवले जाईल.