घरदेश-विदेश'भारताचा परकीय चलन साठा इतर विकसनशील देशांपेक्षा चांगला'; पियूष गोयल यांना विश्वास

‘भारताचा परकीय चलन साठा इतर विकसनशील देशांपेक्षा चांगला’; पियूष गोयल यांना विश्वास

Subscribe

नवी दिल्ली : अत्यंत वाईट परिस्थितीतही भारत पुढील पाच-सहा वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाधानकारक स्थितीत आहे आणि जगातील अन्य कोणत्याही विकसनशील देशाची इतकी चांगली स्थिती नाही, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी दिली. ते बुधवारी (24 मे) भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक अधिवेशनाला संबोधित करत होते. (‘India’s foreign exchange reserves better than other developing countries’; Trust Piyush Goyal)

गोयल म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे महागाईचे व्यवस्थापन करण्यात मदत झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेही मान्यता देताना गेल्या आर्थिक आढावा बैठकीत व्याजदरात बदल केला नाही याचा मला आनंद आहे. आज आपल्याकडे मजबूत परकीय चलनाचा साठा आहे. त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थितीतही भारत पुढील पाच-सहा वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाधानकारक स्थितीत असल्यामुळे जगातील अन्य कोणत्याही विकसनशील देशाची इतकी चांगली स्थिती नाही. विकसित देशांच्या बरोबरीने व्यापारी व्याजदर पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही पियूष गोयल यांनी सांगितले.

- Advertisement -

गोयल म्हणाले की, उद्योगांना गुणवत्ता, नावीन्य आणि कुशल मनुष्यबळावर भर देण्यास सुचवण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की, गुंतवणुकीसाठी, वाढीसाठी आणि आमची आंतरराष्ट्रीय पोहोच वाढवण्यासाठी, तंत्रज्ञान आणण्यासाठी आणि देशात नाविन्य आणण्यासाठी ही चांगली संधी आहे. भारताच्या व्यापार भागीदारांची इच्छा आहे की, भारताने मुक्त व्यापार करारानुसार (FTA) त्वरीत वाटाघाटी करावी. भारत सध्या कॅनडा, EFTA (युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन), यूके आणि युरोपियन युनियन (EU) यांच्याशी अशा करारांसाठी वाटाघाटी करत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

- Advertisement -

हा नवीन भारत
गोयल म्हणाले की, जागतिक व्यवस्थेत भारताचे वाढते महत्त्व दिसून येते. FTA म्हणजे दुतर्फा वाहतूक. मला (उद्योगाला) यूरोपीय मार्केटमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना परवानगी देऊ नका असे कधीकधी सांगितले जात होते, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. पण ते दिवस गेले आहेत, हा नवा भारत आहे. हा असा भारत आहे जो संपूर्ण शक्तीने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगाशी संपर्क साधतो. 2030 पर्यंत देशाची वस्तू आणि सेवा निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही पियूष गोयल यांनी व्यक्त केला.

दोन आठवड्यात $11.7 अब्ज वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, 12 मे 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 3.55 अब्ज डॉलरच्या वाढीसह 599.53 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आरबीआयच्या परकीय चलन साठ्यात गेल्या दोन आठवड्यात 11.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यापूर्वी, 5 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा
$ 595.97 अब्जपर्यंत होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -