घरदेश-विदेशभारताच्या परकीय गंगाजळीत घसरण; गाठली दोन वर्षांची नीचांक पातळी

भारताच्या परकीय गंगाजळीत घसरण; गाठली दोन वर्षांची नीचांक पातळी

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारताची परकीय गंगाजळी अर्थात परकीय चलन दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहचले आहे. भारताकडील परकीय गंगाजळीत $ 4.50 अब्ज डॉलरने घसरण झाली असून ती $ 528.37 अब्ज झाली आहे. 24 जुलै 2020 नंतरचा हा नीचांक आहे.

आरबीआयच्या परकीय चलन मालमत्तेत घट झाल्याने परकीय चलन साठ्यातही घट झाली आहे. ही परकीय चलन मालमत्ता एका आठवड्यात $ 2.8 अब्ज बिलियनने घसरली आहे. याच आठवड्यात आरबीआयची सोन्याची होल्डिंग $ 1.5 अब्ज घसरून आता $ 37.45 बिलियन झाली आहे. 7 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्याला 10 आठवड्यांत थोडा दिलासा मिळाला होता.

- Advertisement -

यावर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेवर हल्ला केल्यापासून भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, सेंट्रल बँकने ऑगस्टमध्ये विदेशी मुद्रा बाजारात $ 4.2 अब्जची निव्वळ विक्री केली आहे.

सप्टेंबरमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते की, जागतिक बाजारपेठेत अनिश्चितचा असून भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे. त्यावेळी त्यांनी वाढत्या अमेरिकन डॉलर आणि यूएस बॉण्डच्या उच्च उत्पन्नामुळे झालेल्या बदलांचा परकीय चलन साठ्यावर होत असून त्यात घसरण होत असल्य़ाचे सांगितले.

- Advertisement -

दरम्यान भारताच्या चालू खात्यातील वाढती तूट आणि घसरत्या रुपयाला आधार देण्यासाठी आरबीआयने घेतलेले निर्णय यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्य़ात घसरण सुरु राहील, असं डॉइश बँकेने सांगितले.


मनी लाँड्रिंग प्रकरणातून अभिनेत्री जॅकलीनला दिलासा; अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -