मुंबई : भारतातील दिग्गज आयटी कंपनी म्हणून ओळखली जाणारी टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (टीसीएस) वर्क फ्रॉम होम आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद करण्यात येत असून पुढील पाच पाच दिवसात कार्यालयात उपस्थित राहण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. यासंदर्भातील ई-मेल कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना पाठविला आहे.
इंग्रजी आर्थिक पोर्टल मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, टीसीएसच्या विविध विभागांचे व्यवस्थापक त्यांच्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करण्यास सांगत आहेत. टीसीएस कंपनीच्या धोरणानुसार गरज पडल्यात काही अपवाद वगळले तर इतर कोणालाही वर्क फ्रॉम होम मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना मेलमध्ये दिल्या सूचना
CNBC-TV18 ने टीसीएसकडून कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले की, “विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि मुख्य ह्यूमन रिसोर्स अधिकारी (CHRO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये जर सुट्टी नसेल तर, दर आठवड्याला 5 दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे.
हा TCS च्या पूर्वीच्या भूमिकेतील एक मोठा बदल आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सप्टेंबर 2022 पासून, कर्मचार्यांनी रोस्टरचे पालन करणे आणि आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात असणे बंधनकारक होते. कर्मचाऱ्यांनी या रोस्टरचे पालन न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला होता.
हेही वाचा – Bigg Boss फेम अभिनेत्रीला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण; काय आहे प्रकरण?
टीसीएसने काय उत्तर दिले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल सर्व टीमला पाठवण्यात आलेला नसून तो वेगवेगळ्या प्रकारे पाठवला जात आहे. TCS ने मनी कंट्रोलच्या प्रश्नांवर भाष्य करण्यास नकार दिला, कारण कंपनी ‘सध्या शांत कालावधीत आहे’.
हेही वाचा – दोन दादांच्या वादामुळे पुण्यात निधी वाटपाचा तिढा; विकासही रखडला
टीसीएस कर्मचाऱ्यांबद्दल जाणून घ्या
टीसीएसचे 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 615,318 कर्मचारी आहेत. कंपनीच्या आर्थिक वर्ष 2023 च्या वार्षिक अहवालानुसार, टीसीएसकडे आज जे कर्मचारी आहेत ते मार्च 2020 नंतर नियुक्त केले गेले आहेत.