घरदेश-विदेशकाश्मीर भारताचे..., संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

काश्मीर भारताचे…, संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी वक्तव्य केले की, ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे आणि कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगत पाकिस्तानमध्ये दोन वेळचे खायचे वांदे, तरीही भारताचा ध्यास काही सुटत नाही, असे त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी दोन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत देशाच्या संरक्षण अधिग्रहणावर टीका करत भारतावर खोटे आरोप केले होते. या आरोपांना पुजानी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुजानी यांनी पाकिस्तानला दहशतवादी देश म्हटले आहे. तसेच पाकिस्तान भारताविरोधात अपप्रचार करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

एवढेच नाही तर पुजानी यांनी तुर्की आणि इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचाच भाग होता, आहे आणि कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मानवी हक्काबाबत पाकिस्तानची चर्चा विनोदी
पाकिस्तानी मंत्र्याच्या मुखातून मानवाविधाकाराची चर्चा ऐकणे म्हणजे विनोदी असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानात आवाज उठवणारे गायब होतात. त्याच्या चौकशी आयागाकडे गेल्या दशकात बेपत्ता व्यक्तींच्या ८,४६३ तक्रारींची नोंद झाली असल्याचेही पुजानी यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताच्या प्रतिनिधी सीमा पुजानी यांनी सांगितले की, जे लोक भारतातील अल्पसंख्यांकांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक लोकांसाठी धार्मिक आजादी नाही आहे. ते त्यांच्या धर्माचे पालन करू शकत नाही. या परिषदेत पाकिस्तानने पाकिस्तानमधील अहमदिया समुदायाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पुजानी म्हणाल्या की, पाकिस्तानमधील अहमदिया समुदायाचा केवळ त्यांच्या धर्माप्रमाणेच छळ केला जात आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये उपजिविकेसाठी वणवण
पाकिस्तानमध्ये लोक त्यांचे जीवन, जीवनशैली आणि स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत, असे असतानाही ते भारताविरोधात चुकीचा प्रचार करत आहेत. अशा परिस्थितीतही पाकिस्तानचा भारताबाबतचा ध्यास काही सुटत नाही. पाकिस्तानने आपली ऊर्जा आणि शक्ती लोकांच्या हितासाठी वापरण्याचा सल्लाही पुजानी यांनी दिला.

पाकिस्तानच्या मंत्री काय म्हणाल्या –
इस्लामाबादमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय समितीला संबोधित करताना खार यांनी भारताचे नाव न घेता पारंपारिक आणि अपारंपारिक शस्त्रांच्या पुरवठ्यावर चिंता व्यक्त करताना दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच कोणत्याही वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचा मर्गही बंद होत आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील एक तृतीयांश लोकांना शांतता आणि विकास हवा आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.
दक्षिण आशियातील सर्वात मोठा देश आण्विक अपवादाचा फायदा घेत आहे, जे त्याच्या अप्रसार नियमांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या 65 सदस्यीय समितीसमोर शस्त्र नियंत्रण आणि नि:शस्त्रीकरण करारावर चर्चा करताना खार त्यांनी या गोष्टी सांगितल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -