भारतात श्रीमंतांची संख्या सात हजाराने वाढली

भारतात श्रीमंतांची संख्या ७ हजार ३०० ने वाढली असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार भारतात श्रीमंतांची संख्या ३.४३ लाखापर्यंत पोहोचली आहे.

indias millionaires now 7300 new names in rich people : report

नेहमीच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असते. काही लोक खूप श्रीमंत असतात तर काही खूप गरीब यामुळे सातत्याने एक तफावत होत असते. आता पुन्हा एकदा भारतात श्रीमंतांची संख्या ७ हजार ३०० ने वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार भारतात श्रीमंतांची संख्या ३.४३ लाखापर्यंत पोहोचली असून या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे. तसेच वैयक्तिक संपत्ती, जमीन आणि इतर अचल संपत्तीच्या रुपात कौटुंबीक संपत्तीमध्ये या संपत्तीचा एकूण ९१ टक्के समावेश असणार आहे.

अहवालानुसार श्रीमंतांची संख्या

भारतात नेहमीच गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असून ही एक चिंतेची बाब राहिलेली आहे. याच दरम्यान आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट सुसीने एक अहवाल दिला आहे. या अहवालात जून २०१७ ते जून २०१८ पर्यंत देशात दहा लाख डॉलर म्हणजेच ७.३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या ३ लाख ४३ हजार राहण्याचा अंदाज आहे. तर श्रीमंतांची संख्या ७ हजार ३०० ने वाढली आहे. या अहवालानुसार भारतात श्रीमंतांच्या श्रेणीतील संख्या ३.४३ लाखांपर्यंत पोहोचली असून या लोकांची एकूण संपत्ती ६ हजार अब्ज डॉलर इतकी आहे. तर या अहवालानुसार जगातील १८.६ टक्के अब्जाधीश महिला एकट्या भारतात असल्याचे समोर आले आहे.

देशाच्या संपत्तीत २.६ टक्क्यांनी वाढ

या अहवालानुसार नव्या श्रीमंतांमध्ये ३ हजार ४०० जणांची संपत्ती पाच कोटी डॉलर असून १५०० जणांची संपत्ती १० कोटी डॉलर म्हणजेच ७३ कोटी रुपये पेक्षा अधिक आहे. या देशाच्या संपत्तीत २.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असून एकूण संपत्ती आता ६ हजार अब्ज डॉलर झाली आहे. पण प्रति व्यक्ती संपत्ती ७०२० डॉलर एवढी असून रुपयाची घसरण सुरु आहे.

असमानता ५३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट सुसीच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक वाढणार आहे. तसेच ही असमानता ५३ टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये ५ लाख २६ हजार असे श्रीमंत असतील असा अंदाज असून ज्यांची संपत्ती ८ हजार ८०० अब्ज डॉलर असल्याने गरीब आणि श्रीमंतांच्या दरीत ५३ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे.