घरदेश-विदेशकोरोना स्थिती बाबत भारताचे चुकले अंदाज,अमेरिकेचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.फौचीने केलं वक्तव्य

कोरोना स्थिती बाबत भारताचे चुकले अंदाज,अमेरिकेचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.फौचीने केलं वक्तव्य

Subscribe

डॉ.फौची यांच्या मते कोरोना व्हायरसची दुसरी लाट इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर असेल याबाबत भरताचे आकलन चुकले आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन संपूर्ण उध्वस्त झाले. अनेक नागरिकांची  आर्थिक,मानसिक आणि अत्याधिक  महत्वाचे म्हणजेच आरोग्य स्थिती बिघडत आहे. आपुर्‍य बेड्स,रुग्णालय,ऑक्सिजन अभावी अनेक कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. अशी महाभयंकर परिस्थिती भारतामध्ये का ओढवली आहे याचे स्पष्टीकरण अमेरिकेचे वैज्ञानिक सल्लागार डॉ.फौची यांनी केलं आहे. डॉ.फौची यांच्या मते कोरोना व्हायरसची दुसरी लाट इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर असेल याबाबत भरताचे आकलन चुकले आहे. तसेच पहिली लाट संपूर्णपणे ओसरण्याच्याआताच सर्व व्यवहार सुरू करण्यात आले. यामुळे इतकी भीषण परिस्थिती ओढावली असल्याचे बोलण्यात येत आहे. कोरोनामुळे व्हायरसमुळे आज देशाला विदारक स्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच या परिस्थितीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली जात आहे. अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असून अमेरिकेतही चर्चाना उधाण आले आहे. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी सिनेट सदस्यांच्या आरोग्य कमिटीसमोर भारतातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल वक्तव्य करत भूमिका मांडली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे भारताला इतक्या गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल असे वाटले नाही यामुळे त्यांना याचे दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. भारताला वाटले आता कोरोना व्हायरस संपला आहे. यामुळे अनेक आर्थिक सर्वजनीक तसेच इतर कामकाज सुरू करण्यात आले यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरत गेला. भारताचा अंदाज चुकला आहे. भारतात असलेले कोरोनाचे गंभीर चित्र पाहता काय करू नये हे जगाला समजले आहे. असे डॉ. अँथनी फौची यावेळेस म्हणाले आहेत.

देशात कोरोनामुळे दिवसाला ४ हजारांहून अधिक जणांचा जीव जात आहे. आतापर्यंत २ लाख ५८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ६२ हजार ७२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५३ हजार १८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – कोरोनाग्रस्तांसाठी एकत्र आले काश्मिरी पंडीत आणि काश्मिरी मुस्लिम, रुग्णांसाठी करतात प्लाझ्माची मदत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -