तैवान वेबसाइटवरील ‘भगवान राम चिनी ड्रॅगनला मारताना’चा फोटो झाला व्हायरल

तैवानचा हा फोटा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी तैवानचे आभार मानत आहेत.

indias rama slaying chinas dragon india china face off taiwan news website photo viral on social media
तैवान वेबसाइटवरील भगवान राम चिनी ड्रॅगनला मारतानाचा फोटो व्हायरल

भारत-चीन दरम्यान लडाख सीमेवर हिंसक चकमकीनंतर आता सोशल मीडियावर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये चीनच्या ड्रॅगनवर भगवान राम वार करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरस होत असलेल्या फोटोवर असे लिहिले आहे की, ‘वी काँकर, वी कील’ म्हणजेच ‘आम्ही विजय मिळवू, आम्ही ठार करू.’

पहिल्यांदा हा फोटो हाँगकाँगच्या LIHKG या सोशल मीडिया साइटने ट्विट केला होता. त्यानंतर होसाईली नावाच्या ट्विटर हँडलने हा फोटो ट्विट केला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला.

माहितीनुसार भारत-चीनमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय अधिकाऱ्यासह २० जवान शहीद झाले आहेत. तर ४३ चिनी सैनिकांचा खात्मा केला, असे वृत्त देण्यात आले आहे.

तैवान न्यूजने आपल्या साइटवर एका लेख लावला होता. ज्यावर लिहिले होते की, ‘इंडियाज रामा टेक्स ऑन चाइनाज ड्रॅगन.’ या लेखासाठी हा फोटो लावला गेला होता. यानंतर LIHKG आणि होसाईलीने ट्विट केले आहे.

इतकेच नाहीतर चिनी मीडिया वेबसाइटने ग्लोबल टाईम्सने भारत-चीन संघर्षाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताची परिस्थिती आणि स्टोरीज सतत दाखवत आहे. मिसाइलचे फोटो व्हिडिओ करत आहे.

१९४८ पासून तैवान आणि चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. तैवानमध्ये चीनविरोधात प्रचंड राग आहे. जेव्हा भारत-चीनमध्ये चकमक झाली त्यानंतर तैवानच्या माध्यमांनी भारताच्या भगवान राम चीनच्या ड्रॅगनला मारता दाखवले. याबाबत सोशल मीडियावर नेटकरी तैवानचे अभिनंदन करत आहे. तर काही लोक आभार मानत आहे.


हेही वाचा – चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना