घरCORONA UPDATEभारताचा Recovery Rate चकीत करणारा; आतापर्यंत ७० लाख रुग्णांची कोरोनावर मात

भारताचा Recovery Rate चकीत करणारा; आतापर्यंत ७० लाख रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

जगभरात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही थांबलेला नसताना देशातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र यातही दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारताने कोविड १९ विरोधातील युद्धात मोठा पल्ला गाठला असून आतापर्यंत तब्बल ७० लाख रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली असून हा मोठा रिकव्हरी रेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ६ लाख ६८ हजार १५४ कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८.५० टक्के आहे, तर आतापर्यंत ७० लाख ७८ हजार १२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे बरे झालेल्या आणि सक्रिय रुग्णांमधील अंतर वाढत असून हा फरक ६४ लाख ९ हजार ९६९ रुग्ण इतका आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या एक आठवड्यापासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या एक हजाराहून कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ही संख्य १ हजार १०० पेक्षा कमी राहिली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५७८ जणांचा मृत्यू झाल आहे. त्यातील ८० टक्के रुग्ण केवळ १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधित १३७ जणांच्या मृत्यूची नोंद असून त्या पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ५९, छत्तीसमध्ये ५५ तर कर्नाटकात ५२ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

हेही वाचा –

मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचंय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -