घरCORONA UPDATECoronaVirus : कोरोना विषाणूपासून बचावासाठी देशी जुगाड

CoronaVirus : कोरोना विषाणूपासून बचावासाठी देशी जुगाड

Subscribe

योगेश कुमार हे एक खेळाडू आहेत. पण लहानपणापासून त्यांना इंजिनिअरिंगचा छंद आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथील पटेल नगर परिसरात राहणारे योगेश कुमार लॉकडाऊन काळात त्याची मोठी चर्चा सुरू आहे. योगेश कुमार हे एक खेळाडू आहेत. पण लहानपणापासून त्यांना इंजिनिअरिंगचा छंद आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करून काहींना काही वस्तू बनवत असतात. जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावेळी योगेश कुमार यांनी जुगाड टेक्नॉलॉजी वापर करून त्यांनी आपल्या परिवाराला कोरोना संसर्गापासून वाचविण्याचे उपाय शोधले आहेत.

जो कोणी अपार्टमेंटमध्ये येईल. त्याला हात धुण्यासाठी जुगाड टेक्नॉलॉजी नळ तयार करण्यात आला आहे. नळाला न हात लावता व्यक्ती आपले हात धुवू शकतो.

- Advertisement -

सॅनिटायझिंग मशीन

अपार्टमेंटमध्ये आलेली व्यक्ती भाजीपाल्याची खरेदी करून आला आहे. तर अपार्टमेंटच्या बाहेर जुगाड टेक्नॉलॉजीची सॅनिटायझिंग मशीन बसविण्यात आली आहे. २० लिटरच्या पेंटचा डब्ब्या कापून सॅनिटायझिंग मशीन बनविण्यासाठी आली आहे. ज्यात पाणी, तुरटी, व्हिनेगर आणि मीठ यांचे मिश्रण करून ठेवले आहे.

सॅनिटायझिंग बॉक्स
सॅनिटायझिंग बॉक्स

या डब्याच्या आत भाज्या टाकून थोडा वेळ फिरविल्यावर भाज्या आणि फळ सॅनिटाईज होऊन जातात. या सर्व प्रक्रिया करून व्यक्ती हा घरी संसर्ग मुक्त होऊन जातो.

- Advertisement -

यूवी रेडिएशन

अपार्टमेंट खाली सॅनिटायझेशन बॉक्स बनवला आहे. यामध्ये यूवी रेडिएशन निघतात. बहुतेक खाण्या पिण्याच्या वस्तू या पॅकेट बंद असतात. यांना धुतले जाऊ शकत नाही. या कारणामुळे या वस्तू यूवी बॉक्स मध्ये टाकल्यावर संसर्ग मुक्त होतात.

योगेश कुमार यांच्या घरी दरवाजा बाहेर शरीराचे तापमान मोजण्याची मशीन लावण्यात आली आहे. व्यक्तीचा पारा नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर मशीन वाजायला लागते. म्हणजे या घरात व्यक्तीला प्रवेश नाही. योगेश कुमार यांनी सर्वच जुगाड टेक्नॉलॉजी मशीनला बनविण्यासाठी सेन्सरचा वापर केला आहे.

टोपीमध्ये सेन्सर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खूप वेळ सांगितले की, कोविड-१९ महामारीपासून आपल्या बचाव करायचा असेल तर सामाजिक अंतर हा योग्य उपाय आहे. यासाठी योगेश कुमार यांनी एक टोपी बनविली आहे. टोपीच्या वरच्या भागात सेन्सर लावण्यात आला आहे. या टोपीच्या घातल्यावर जी व्यक्ती १ मीटरच्या अंतरात येईल. तर सेन्सर वाजायला लागतो. म्हणजे आजूबाजूला धोका आहे.

सेन्सर टोपी
सेन्सर टोपी

योगेश कुमार म्हणतात की, मला लहानपणापासूनच घरात पडलेल्या बेकार वस्तूंचा वापर करून जुगाड टेक्नॉलॉजी पासून उपयोगी यंत्र बनविण्याचा शौक आहे. भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -