Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश IndiGo कडून प्रवाशांना आकर्षक ऑफर! Covid Vaccine घेतलेल्यांना मिळणार भाड्यात सूट

IndiGo कडून प्रवाशांना आकर्षक ऑफर! Covid Vaccine घेतलेल्यांना मिळणार भाड्यात सूट

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. अशातच जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून काही न काही युक्त्या केल्या जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. अशापरिस्थितीत इंडिगो एअरलाईन्सने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर दिली आहे. इंडिगोने कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतलेल्या प्रवाश्यांसाठी भाड्यात दहा टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. ही योजना बुधवारपासून अंमलात आली आहे. ही सवलत मर्यादित वर्गात केवळ बेस भाड्यावर मिळणार असल्याचे एअरलाइन्सने सांगितले.

- Advertisement -

एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले की, ‘या योजनेचा फायदा फक्त तिकिट बुकिंगच्या वेळी भारतात असणार्‍या आणि कोविड लसीचा कमीतकमी एक डोस घेतलेल्यांनाच मिळू शकणार आहे. ज्या व्यक्तीला सूट देण्यात आली आहे, त्यांना आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने विमानतळाच्या चेक-इन काउंटर व बोर्डिंग गेटवर दिलेले लसीकरण प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य असणार आहे. याशिवाय प्रवासी आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅपद्वारे त्यांच्या लसीकरणाचा पुरावा देखील सादर करू शकतात.

“देशातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून, लोकांना कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये हातभार लावण्यासाठी प्रोत्साहित करणे आपले कर्तव्य आहे.”, असे इंडिगोचे मुख्य धोरण आणि महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले आहे. या ऑफरसाठी मर्यादित यादी उपलब्ध असून सवलत मिळेल तेव्हाच दिली जाईल. या ऑफरला इतर कोणत्याही ऑफर, योजना किंवा बढतीसह एकत्रित केले जाऊ शकत नाही. ही ऑफर सध्या फक्त इंडिगोच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तिकिट बुकिंग व अधिक तपशीलांसाठी ग्राहक https://www.goindigo.in/ वर लॉग इन करू शकतात, असेही एअरलाइन्सने म्हटले आहे.


Covid Vaccination: … तर लसीकरणासाठी नोंदणी, ओळखपत्राची आवश्यकता नाही, केंद्रांवर ‘ऑन-साइट’ नोंदणी सुविधा

- Advertisement -