Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर आली दिवाळी २०१८ दिवाळीत करा स्वस्त विमान प्रवास; इंडिगोचा मेगा सेल

दिवाळीत करा स्वस्त विमान प्रवास; इंडिगोचा मेगा सेल

Subscribe

इंडिगो कंपनीने दिलेल्या या ऑफर अंतर्गत खरेदी केलेल्या तिकीटावर प्रवासी, ८ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत प्रवास करु शकतात.

दिवाळीचा सण म्हटलं की वेगवेगळ्या ‘सेल्स’चा आणि ‘ऑफर्स’चा पाऊस पडायला सुरुवात होते. सणासुदीच्या काळात विविध कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. याच धर्तीवर इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी खास दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. इंडिगोचा ‘दिवाळी सेल’ केवळ १० लाख तिकीटांवरच लागू होणार आहे. या ऑफर
अंतर्गत डोमेस्टिक प्रवासासाठी ८९९ रुपयांच्या तिकीटांपासून सुरुवात होणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी किमान ३ हजार ३९९ रुपये मोजावे लागणार आहेत. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना देशातील तसंच देशाबाहेरील ६४ ठिकाणांवर प्रवास करता येणार आहे. सणासुदीच्या काळात लोक आपल्या नातलगांना भेटण्यासाठी अन्य शहरांमध्ये प्रवास करत असतात.  याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात विमान प्रवास करता यावा, यासाठी इंडिगोने हा ‘दिवाळी सेल’ जारी केल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

इंडिगो कंपनीने दिलेल्या या ऑफर अंतर्गत खरेदी केलेल्या तिकीटावर प्रवासी, ८ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत प्रवास करु शकतात. कोणकोणत्या मार्गांसाठी ही ऑफर जारी करण्यात आली आहे, त्याची माहिती इंडिगोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


वाचा: विमानतळ प्रकल्पबाधितांची दिवाळी जोमात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -