घरदेश-विदेशबिघाडामुळे इंडिगो विमानाची तात्काळ लँडिंग

बिघाडामुळे इंडिगो विमानाची तात्काळ लँडिंग

Subscribe

अहमदाबाद येथे इंडिगो विमानातून धूर निघाल्यामुळे तात्काळ लँडिंग करण्यात आली आहे. सतत होणाऱ्या या लँडिंगमुळे केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी सेफ्टी ऑडिटचे निर्देष दिले आहेत.

इंडिगो विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोलकाता येथे तात्काळ लँँडिंग केल्याची घटना ताजी असतानाच अहमदाबाद येथेही अशीच घटना घडली आहे. विमानातून धूर येत असल्यामुळे विमानकर्मचाऱ्यांनी अहमदाबाद येथे तात्काळ लँडिंग केली आहे. लँडिंगनंतर या विमानातून धूर येत असल्याचे आढळून आले आहे. बदललेले वातावरण आणि धूक्यामुळे मागील काही दिवसांपासून विमानात बिघाडाच्या घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. फ्लाइटमधील क्रू सदस्यांना विमानात जळण्याच्या वास येत होता. याची माहिती क्रू मेंबर्सने पायलटला दिली. पायलटने या विमानाची तात्काळ लँडिंग केली. इंडिगोच्या ए ३२० विमानात ही घटना घडली.

“दिल्ली-अहमदाबाद मार्गावर उडणारे विमान ६ ई ६३७३ हे विमान १ जानेवारी रोजी तात्काळ लँड करण्यात आले. विमानात उपस्थित असलेल्या क्रू ला विमानात जळण्याचा वास आला होता. यानंतर विमानाचे लँडिंग करुन प्रवाशांसाठी  दुसऱ्या विमानाचे आयोजन करण्यात आले. इंडिगो या विमानाचा पसास सुरु आहे.” – इंडिगो एअरलाइन्सचे, प्रवक्ते

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांनी दिले निर्देष

यापूर्वी जयपूर-कोलकाता येथे प्रवास करणाऱ्या विमानातही तांत्रिक बिघाड झाला होता. विमान अपघात तपासणी विभाग (एएआयबी) द्वारे याची तपासणी केली जात आहे. या विमानात १३७ प्रवाशी होते. प्रवासादरम्यान अचानक या विमानातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विमानाचीही तात्काळ लँडिंग करण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या लँडिंगमुळे केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -