घरताज्या घडामोडीधक्कादायक! विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; १४ क्रू मेंबर्सना केले होम क्वॉरंटाईन

धक्कादायक! विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; १४ क्रू मेंबर्सना केले होम क्वॉरंटाईन

Subscribe

विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रू मेंबर्सना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास राज्य सरकारने २५ मे पासून परवानगी दिली. त्यानंतर विमानाने आकाशात भरारी घेतली खरी. मात्र, काही तास होत नाहीत तर विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रू मेंबर्सना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

खासगी विमान कंपनी इंडिगोमधून कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी बेंगरुळ ते मदुरई इंडिगो 6E 7214 ने प्रवास करत होतो. दरम्यान, विमानतळावर या प्रवाशाची तपासणी केली असता त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, आता त्या प्रवाशाची तपासणी केली असता ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, प्रवाशाला कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आल्यानंतर १४ क्रू मेंबर्सना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी घेतली होती सुरक्षेची काळजी

विमान प्रवाशांची योग्य प्रकारे काळजी घेतली होती. प्रत्येक प्रवाशांनी तोंडाला मास्क, फेस मास्क, फेस शील्ड आणि हातात हँड ग्लोज देखील घातले होते. तसेच प्रवास करण्यापूर्वी संपूर्ण विमानाला सॅनिटाएजर करण्यात आले होते. तसेच प्रवासी उतरल्यानंतर पुन्हा विमानाचे सॅनिटाएजर केले गेले आहे. मात्र, या घटनेमुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे मुलाचा मृत्यू झाला, कुटुंब आधी खूप रडलं मात्र स्मशानात त्यांना आनंद झाला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -