घरदेश-विदेशआई-आजीला बसवलं विमानात; पाया पडून केलं विमान सुरु

आई-आजीला बसवलं विमानात; पाया पडून केलं विमान सुरु

Subscribe

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून, पायलट असूनही थेट विमानात आपल्या आई आणि आजीच्या पाया पडणाऱ्या या वैमानिकाचं लोक कौतुक करत आहेत.

आपल्या मुलाला शिकवण्यासाठी, त्याला मोठ्या पदापर्यंत पोहचवण्यासाठी पोहचण्यासाठी आई-वडील जीवाचं रान करतात, खूप मेहनत घेतात. आपल्या मुलांनी पुढे जाऊन याची जाण ठेवावी इतकीच त्यांची अपेक्षा असते. जवळपास सगळ्याच पालकांची अशी अपेक्षा असते आणि त्यातही ज्यांची अपेक्षा पूर्ण होते अशा पालकांना आकाश ठेंगणं होतं. चेन्नईमध्ये अशीच एक गोष्ट घडली असून, जगभरात सध्या त्याचीच चर्चा आहे. पायलट (वैमानिक) बनलेल्या एका तरूणाने त्याच्या पहिल्याच विमान उड्डाणाच्या निमित्ताने, आई आणि आजीला विमानप्रवासाची संधी उपलब्ध करुन दिली. इतकंच नाही तर आपल्या आई आणि आजीला विमानात बसवल्यानंतर, या वैमानिकाने उड्डाणापूर्वी चक्क पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. या भावनिक क्षणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून, पायलट असूनही थेट विमानात आपल्या आई आणि आजीच्या पाया पडणाऱ्या या वैमानिकाचं लोक कौतुक करत आहेत. वैमानिकाच्या पदावर पोहचल्यानंतर आपल्या कुटुंबियांना विमान प्रवास घडवणाऱ्या या पायलटचं जगभरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

उपलब्ध माहितीनुसार, प्रदीप कृष्णन असं या वैमानिकाचं नाव असून तो इंडिगो विमानचा वैमानिक आहे. प्रदीप त्याच्या आयुष्यातील पहिलं विमान उड्डाण करणार होता. त्यामुळे त्याने आपल्या आई आणि आजीला हा विमान प्रवास घडवण्याचे निश्चीत केले. याशिवाय कोणतंही काम करण्यापूर्वी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत या भावनेतून त्याने उड्डाणापूर्वी आई आणि आजीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. आई-आजीच्या पायाला हात लावून प्रदीप त्यांचे आशीर्वाद घेत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. ज्यावेळी आपला मुलगा किंवा नातू पायलट बनेल, त्याचवेळी विमानाने प्रवास करणार अशी शपथ प्रदीपच्या आई आणि आजीने घेतली होती. अखेर त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. दरम्यान, या भावनिक प्रसंगाचे विमानातील प्रवाशीही साक्षीदार बनले. त्यांच्यापैकीच एका प्रवाशाने त्या प्रसंगाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत असून, प्रदीपवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -