घरदेश-विदेशIndiGo विमान अपघातातून थोडक्यात बचावले, इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरले

IndiGo विमान अपघातातून थोडक्यात बचावले, इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरले

Subscribe

IndiGoचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले. विमान धावपट्टीवरून घसरल्याने चिखलात अडकले.

खासगी विमान कंपनी इंडिगोचे विमान अपघातातून बचावले आहे. कोलकात्याहून जाणारे इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवरून घसरल्याने विमान चिखलात अडकले. सुदैवाने यावेळी एकही प्रवासी जखमी झाला नाही. विमानाने आसाममधील जोरहाट येथून कोलकात्यासाठी उड्डाण केले.

घटनेच्या चौकशीसाठी टीम –

- Advertisement -

इंडीओ एअरलाइन्सने या घटनेची माहिती दिली आहे. एअरलाईन्सने सांगितले की, जोरहाटहून टेक ऑफ करताना विमान धावपट्टीवर घसरले आणि चिखलात अडकले. या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आल्याचेही एअरलाइन्सने म्हटले आहे. विमानाच्या प्राथमिक तपासणीदरम्यान कोणतीही असामान्यता दिसलेली नाही.

विमानात 98 प्रवासी –

- Advertisement -

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ता नुसार विमानात एकूण 98 प्रवासी होते. इंडिगोच्या फ्लाइटने 6E-757 गुरुवारी दुपारी 2.20 वाजता उड्डाण केले. उड्डाणाच्या वेळी विमानाची चाके धावपट्टीवरून घसरली आणि चिखलात अडकली. या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या मदतीने प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.

इंडीगोने निवेदन केले जारी –

इंडीगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, वैमानिकाने सावधगिरी म्हणून टॅक्सी प्रक्रिया पार पाडली आणि आवश्यक तपासणी करण्यास सांगितले. विमान पुन्हा जोरहाटला तपासणीसाठी नेण्यात आले. प्राथमिक तपासणी दरम्यान कोणतीही असामान्यता आढळली नाही. घटनेची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले.

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांची घटनांबद्दल माहिती –

गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या विमानांसोबत अनेक घटना घडल्या आहेत. अलीकडेच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 दरम्यान विमानात तांत्रिक बिघाडांशी संबंधित एकूण 478 घटना घडल्या.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -