घरदेश-विदेशवेब चेक - इनसाठी मोजावे लागणार पैसे

वेब चेक – इनसाठी मोजावे लागणार पैसे

Subscribe

आता जर तुम्ही विमान प्रवासासाठी 'वेब चेक - इन' करत असाल तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

आता जर तुम्ही विमान प्रवासासाठी ‘वेब चेक – इन’ करत असाल तर ही सेवा तुम्हाला मोफत मिळणार नसून त्याकरता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. स्पाइस जेट आणि इंडिगो या देशातील दोन महत्त्वाच्या विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विमानसेवा देणाऱ्या कंपन्या तोट्यात आहेत आणि त्याची भरपाई करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत आहेत. त्यामुळे आता इंडिगो कंपनीने रविवारपासून वेब चेक – इनसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही चेक – इनसाठी विमातळावर लांब रांगेत उभे राहणे टाळण्यासाठी वेब चेक – इन करतात. मात्र आता यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.

- Advertisement -

कंपनीच्या पॉलिसीनुसार आताकण्यात येणार चार्ज

एका प्रवाशाच्या ट्विटला उत्तर देताना इंडिगोने सांगितले की, प्रवाशांना आपले वेब चेक – इन पूर्ण करण्यासाठी एका सीटसाठी पैसे भरावे लागणार आहेत. इंडिगो या कंपनीच्या पॉलिसीनुसार, वेब चेक – इनसाठी सर्व सीटसाठी चार्ज आकारले जाणार आहेत. याला पर्याय म्हणून तुम्ही विमानतळावर मोफत चेक – इन करु शकता. तसेच विमानातील सीट्स जशा उपलब्ध असतील तशा दिल्या जातील, असे देखील इंडिगोने म्हटले आहे.

- Advertisement -

सीट निवडण्यासाठी मोजावे लागणार पैसे

विमातळावर चेक – इनची सेवा मोफत जरी असली तरी देखील वेब चेक – इमकरता पैसे मोजावे लागणार आहेत. एका वृत्तानुसार इंडिगो यासाठी १०० रुपये आणि स्पाइस जेट यासाठी ९९ रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या आवडीच्या सीटकरता अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. मात्र आता वेब चेक – इनसाठी देखील अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. वेब चेक इन चार्ज असण्याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे किंवा ग्रुपमधून प्रवास करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या सीट्स निवडा किंवा फ्री मिडल रोची निवड करता येते.

असा असणार चार्ज

इंडिगोमध्ये जर तुम्ही १२ आणि १३ व्या रांगेतील सीट निवडणार असाल तर तुम्हाला ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर दुसऱ्या रांगेपासून दहाव्या रांगेपर्यंतच्या सीट्साठी ३०० रुपये लागणार आहेत. तसेच ११, १४ ते २० व्या रांगेतील सीट्, पाहिजे असेल तर २०० रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या सीट्स निवडीवर चार्ज लावल्यामुळे प्रवाशांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – ‘इंडिगो विमानात बाँब’.. एका फोनने उडाली प्रवाशांची झोप!

वाचा – अवघ्या ९९९ रुपयांत करा, इंडिगो विमानाचा प्रवास!

वाचा – इंधन दरवाढीमुळे इंडिगोचे तिकीट महागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -