घरताज्या घडामोडीIndin Railway जनरल डबेही होणार कूल कूल, वर्षाखेरीस जनरल बोगीतून करा एसी...

Indin Railway जनरल डबेही होणार कूल कूल, वर्षाखेरीस जनरल बोगीतून करा एसी प्रवास

Subscribe

सर्वसामान्यांनाही आरामदायक प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने योजना बनवली आहे. यात सेकंड क्लास बोगीही(AC general second class coach) एसी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

या यावर्षाखेरीस जर तुम्ही कुठे बाहेरगावी जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सर्वसामान्यांनाही आरामदायक प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने योजना बनवली आहे. यात सेकंड क्लास बोगीही(AC general second class coach) एसी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

याचबरोबर सामान्यांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकारक कसा करता येईल यावर रेल्वे विचार करत आहे. नवीन एसी जनरल सेकेंड क्लासचे डबे कपूरथळाच्या रेल्वे फॅक्टरीत तयार करण्यात येणार आहे.या डब्याचे डिझाईन फायनल झाले असून यावर्षाखेर हे नवीन एसी सेकंड क्लास डबे प्रवासांच्या दिमतीला हजर असतील. सध्या जनरल सेकंड क्लास डब्यामधून १०० प्रवासी प्रवास करू शकतात. या डब्यांच्या निर्मितीसाठी २.२४ कोटी रुपये एवढा खर्च येतो. पण नवीन एसी जनरल सेकंड क्लासमध्ये अधिक प्रवासी बसू शकणार आहेत. या नव्या रचनेनुसार रेल्वेचा वेगातही बदल करण्यात येणार असून त्यानुसार नवीन गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटर एवढा असेल.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -