घरताज्या घडामोडीसीमेवर नेपाळ पोलिसांचा अंदाधुंद गोळीबार; ४ भारतीय जखमी, १ ठार

सीमेवर नेपाळ पोलिसांचा अंदाधुंद गोळीबार; ४ भारतीय जखमी, १ ठार

Subscribe

दोघांची प्रकृती चिंताजनक

भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ४ भारतीयांना गोळ्या लागल्या असून जखमी झाले आहेत. तर एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्या भारत-नेपाळ सीमा वाद सुरु आहेत. नेपाळच्या संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताच्या सीमाभागांचा समावेश नेपाळमध्ये केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

नेपाळ पोलिसांच्या अंदाधुंद गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सीतामढीच्या सोनमर्सा सीमावर्ती भागातील जानकीनगर गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी सीमाभागात जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

- Advertisement -

नव्या नकाशाने भारत-नेपाळ संबंध खराब

नकाशावरून सध्या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. भारताचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे संकट उभं राहिलं आहे. वाटाघाटीपूर्वी नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. या नवीन नकाशामध्ये नेपाळने एकूण ३९५ चौरस किमी क्षेत्रफळ दर्शविले आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे. नेपाळने आपल्या नकाशामध्ये कलापाणीचे ६० चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचं म्हणून घोषित केलं आहे. त्याचप्रमाणे नेपाळने लिंपियाधूराच्या ३९५ चौरस किलोमीटर भागावर आपला दावा केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यता देण्यात आली.


हेही वाचा – भयानक! दिल्लीत अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह वेटिंगवर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -